Friday, April 26, 2024
Homeजळगावमस्कावद येथे बारागाड्यांचा जल्लाेष

मस्कावद येथे बारागाड्यांचा जल्लाेष

मस्कावद Maskavada ता. रावेर (वार्ताहर)

मस्कावद सिम, बुद्रुक ,खुर्द यांच्या त्रिवेणी संगमावर बस स्टँड परिसरात आज खंडेराव महाराज (Khanderao Maharaj) यात्रेनिमित्त (Yatra) भगत चंद्रकांत उत्तम कोळी (Bhagat Chandrakant Uttam Koli) यांनी बारा गाड्या ओढून (Pulling twelve carts) 130 वर्षांची परंपरा अखंडितपणे सुरु ठेवली.

- Advertisement -

भगत चंद्रकांत उत्तम कोळी यांनी बारा गाड्या (twelve carts) ओढून 130 वर्षांची परंपरा अखंडितपणे सुरु ठेवली. त्याचे बगले म्हणून हर्षल होले, हेमंत कोळंबे यांनी आपली जबाबदारी पार पाडली तर रविंद्र कोळी यांच्या अंगात खंडोबा महाराज सवारी येवून यांनी बारागाड्या ओढण्यासाठी महत्वाची भूमिका पार पडली. मागील दोन वर्षापासून कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे 130 वर्षाची परंपरा असलेली येथील यात्रेत (Yatra) खंड पडलेला होता. त्यामुळे ह्या यात्रा उत्साहात उपस्थित भाविकांमध्ये उत्साह दिसत होता. यानिमीत्ताने खंडोबा मंदीरावर आकर्षक रोषणाई केली होती.गावात खेळण्याची , घरगुती वस्तूंची दुकाने व विविध खाद्य पदार्था चे दुकाने थाटण्यात आले होते.
मस्कावद खु येथील कोळी समाजाने चालवलेल्या हा वारसा म्हणजे लेवा समाजासह इतर समाजाचा सलोखा ह्या बारागाड्या (twelve carts) ओढतांना मस्कावद सीम बु.व खु येथील सर्व समाजाचे एकोप्याचे दर्शन (unity of society) घडतांना दिसत होते या वेळेस विविध घरगुती वस्तू खरेदीचा कल महीला वर्गात दिसत होता. असंख्य भक्तगणांनी या वेळेस मंदिरात दर्शन घेतले .

यात्राउत्सव यशस्वीसाठी जगन्नाथ गोविंदा कोळंबे, वासुदेव दशरथ कोळी,उमेश पाटील,नारायण गंगाधर पाटील रविंद्र कोळी, हर्षल रमेश होले,योगेश कोळंबे ,लिलाधर कोळी,तसेच मस्कावद सीम,बु व खु येथील नवयुवक ,बालगोपाल यांनी परिश्रम घेतले. तर सावदा सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी. इंगोले पोलीस उपनिरीक्षक एस आर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ.स्वप्नील सपकाळे, विनोद पाटील,होमगार्ड विनोद तडवी,सुनील तायडे, योगेश चोधरी, प्रमोद वाघुळदे निलेश खाचणे, किशोर पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या