Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकNashik : शहरातील 'या' मंदिरात दर्शनासाठी जात आहात? आधी ही बातमी वाचा

Nashik : शहरातील ‘या’ मंदिरात दर्शनासाठी जात आहात? आधी ही बातमी वाचा

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

शहरातील काळाराम मंदिर संस्थानने (Kalaram Mandir) केंद्र व राज्य शासनाने कोविड 19 (covid 19) संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करून सुधारित विषाणूच्या संसर्गाचा संभाव्य प्रसार व संसर्ग टाळण्याच्या हेतूने मास्कचा (mask) वापर करावा व गर्दी टाळावी असे आव्हान केले आहे…

- Advertisement -

केंद्र व राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानुसार, भाविकांनी करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून मास्कचा वापर करून काळाराम मंदिरात व मंदिर परिसरात प्रवेश करावा व काळाराम मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करावे. याशिवाय भाविकांनी स्वत:ची काळजी घेऊन करोनाचा प्रादुर्भाव टाळावा असे आवाहन काळाराम मंदिर संस्थांनचे अध्यक्ष डॉ. विजय मोरे (Dr. Vijay More) यांनी केले आहे.

दरम्यान, सध्या सुट्ट्या असल्याने मंदिर परिसरात मास्क न वापरता दर्शन घेण्यासाठी गर्दी करणाऱ्या भाविकांची संख्या अफाट आहे. त्यामुळे सामाजिक अंतराचे पालन करून कोविड प्रतिबंधक लसीचे (vaccine) लसीकरण व बूस्टर डोस घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, अशा प्रकारचा सूचना फलक देखील मंदिर संस्थानने प्रवेशद्वारावर लावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या