Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककळसुबाई शिखर सर करत मास्क व लसीकरण जनजागृती

कळसुबाई शिखर सर करत मास्क व लसीकरण जनजागृती

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नववर्षाच्या सुरुवातीला निफाड तालुक्यातील करोना योद्ध्यांनी महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमधील सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसुबाई येथे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. करोनाला घाबरून न जाता, करोनापासून बचावासाठी, मास्क वापरा, हात धुवा आणि सामाजिक अंतर बाळगा, याबद्दल करोना योद्ध्यांनी जनजागृती केली.

- Advertisement -

तसेच रविवारी (दि. १७) संपूर्ण महाराष्ट्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आयोजित केलेली आहे.

या दिवशी सर्वांनी आपल्या शून्य दिवस ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजावे, असे आवाहन करण्यात आले. सध्याचे पल्स पोलिओ लसीकरण करोनाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी करोनाबाबतची सर्व काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन केले.

आरोग्य विभाग, निफाड तालुका पंचायत समिती, निफाड यांच्या करोना योद्ध्यांच्या सदर पथकांमध्ये माजी तालुका आरोग्य अधिकारी तथा संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे, तालुका नोडल अधिकारी डॉ. योगेश शिंदे, कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, आरोग्यसेवक दिलीप बोदडे, प्रदीप पवार, गजानन जयतकर, गोरक्षनाथ गाढवे, कोंडीराम बनगर, सुरेश सोनवणे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या