Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादकरांना मास्कची 'ऍलर्जी'?

औरंगाबादकरांना मास्कची ‘ऍलर्जी’?

औरंगाबाद- (Auranbagad)

कोरोनाची दुसरी लाट (The second wave of corona) ओसरली असली तरी महापालिकेकडून संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शहरात विनामास्क फिरणार्‍या तसेच रस्त्यांवर कचरा टाकणार्‍यांना दंड आकारण्याची मोहीम सुरूच आहे. पालिकेच्या पथकाने नियमांचा भंग करणार्‍यांवर कारवाई करत 55,600 रूपयांचा दंड वसूल केला.

- Advertisement -

पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून शासन निर्देशान्वये पालिकेने ही कारवाई अद्याप देखील सुरूच ठेवली आहे. यासोबतच रस्त्यावर कचरा टाकणे, बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच पडून ठेवणे, प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणे याप्रकरणी देखील पालिकेच्या या पथकाकडून कारवाई केली जात आहे.

घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा उपायुक्‍त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वात हे पथक प्रतिदिन शहरात कारवाई करीत आहे. याअंतर्गत रविवारी दिवसभरात विनामास्क फिरणार्‍या एकूण 54 व्यक्तींकडून 500 रुपये दंडप्रमाणे 27000 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच रस्त्यावर जास्त कचरा आढळून आल्याबद्दल 24 जणांकडून 11600 रूपये, शहरातील विविध ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावर आढळुन आल्याबद्दल 5 जणांकडून 12000 रुपये दंड वसूल केला. शहरातील अदालत रोड येथील तिरवी डिस्ट्रीबुटर्स यांच्याकडून मेडिकल कचरा रोडवर टाकल्याबद्दल 5000 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोना प्रतिबंधासाठी शासन निर्देशांनुसार सार्वजनिक वाहतूक सेवेअंतर्गत येणार्‍या रेल्वे स्टेशन, विमानतळ येथे नियमित प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. रविवारी रेल्वेस्टेशन येथे 49 रेल्वे प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. तर विमानतळ येथे 15 विमान प्रवाशांची चाचणी करण्यात आली. या दोन्ही ठिकाणांवर केलेल्या चाचण्यांतून एकाचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या