Friday, April 26, 2024
Homeनाशिकशहीद स्मारक युवकांना प्रेरणादायीः आ.कोकाटे

शहीद स्मारक युवकांना प्रेरणादायीः आ.कोकाटे

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील घोरवड येथील शहीद जवान शंकर केरु हगवणे यांचे स्मारक (Monument) हे सर्व जवानांना, भावी पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल असा विश्वास जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे (Zilha Parishad Member Simantini Kokate) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

घोरवड येथे हगवणे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणप्रसंगी त्या बोलत होत्या. 9 जून 2001 रोजी जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुपवाडा (Kupwada) येथे अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेल्या हगवणे याची प्रेरणा घेऊन गावातील सुमारे 20 तरुण मुले आज देशासाठी सैन्यामध्ये काम करत असल्याची बाब सर्वांसाठी अभिमानाची आहे.

शहीद शंकर यांच्या रुपाने होणारे स्मारक हे संपूर्ण राज्यात एक आदर्श, प्रेरणादायी, आगळे वेगळे बनावे. सर्वांनी एकत्र येऊन लोकोपयोगी, तरुण, महिला, वृध्दांना हे उपयुक्त ठरेल अशी रचना करावी, त्यांच्या कार्याचा डिजिटल फलक (Digital panel), माहिती केंद्र (Information Center), स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या मुलांसाठी मार्गदर्शन केंद्र स्थापन करुन नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कोकाटे यांनी केले.

आमदार माणिकराव कोकाटे (mla manikrao kokate) यांच्या विकास निधीतून (Development Fund) यासाठी 15 लाखाची तरतूद केली असून उर्वरित निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कचरु हगवणे यांनी शहिद शंकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, बाजार समितीचे संचालक सोमनाथ भिसे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वीरमाता हिराबाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, शिवडेचे सरपंच प्रभाकर हरक, घोरवडच्या सरपंच उषा भुजबळ, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक प्रदीप शिंदे, अंबादास भुजबळ, ग्रामसेवक योगेश चित्ते, विशाल कानडे, प्रल्हाद हगवणे, पांडू हगवणे, निलेश हागवणे, उत्तम हगवणे, सोमनाथ हगवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या