Thursday, April 25, 2024
HomeजळगावVideo शहिद यश देशमुख अनंतात विलीन

Video शहिद यश देशमुख अनंतात विलीन

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळगाव येथील सुपुत्र शहिद यश दिंगबर देशमुख (२१) यांच्यावर शनिवारी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात सकाळी १२.३० वाजेच्या सुमारास आर्मीचे जवान व पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. .

- Advertisement -

लहान भावाने शहिद यश यांच्या पार्थिवाला भडाग्नी देण्यात आला. यावेळी कुटुंबिसासह उपस्थित महिला, पुरुष, माजी सैनीक अनेकांना अश्रु अनावर झाल्याने जणू अश्रुचा महापूरच आल्याचे दृष्य दिसत होते. तत्पूर्वी पार्थिव गावात दाखल झाल्यावर आई-वडील भाऊ-बहिण व इतर नातेवाईकांनी एकच आक्रोश करत, सर्वांची मने सुन्न केली. पार्थिवासोबत आलेल्या आर्मीचे जवान व पोलिसांनी बंदुकीच्या फैर्‍या झाडुन शहिद यशला अखेरची मानवंदना दिली. तर शहीद जवान यश देशमुख अमर रहे…! पाकिस्तान मुर्दाबाद…! च्या घोषणा देण्यात आल्या. फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांच्या पार्थिवाची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या