Saturday, April 27, 2024
Homeनगरशहिद जवान साठे यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

शहिद जवान साठे यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

लोणी हवेलीची सुपुत्र रामचंद्र लहु साठे या 30 वर्षीय वीर जवानाला देशसेवा करत असताना जम्मू काश्मीरमध्ये वीरगती प्राप्त झाली. त्यांचे पार्थीव आज पारनेर तालुक्यात दाखल झाल्यानंतर अंत्य दर्शनासाठी तालुकाभरातून नागरीकांनी एकच गर्दी केली होती. लोणी हवेली गावात शासकिय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

- Advertisement -

Video : गोदावरीला पूर आल्यामुळे काथनाल्यावर पाणी

शहीद जवान साठे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी 9 वाजता पारनेर शहरामध्ये आले असता आमदार नीलेश लंके व नगराध्यक्ष विजय औटी यांनी या वीर जवानाच्या पार्थिवास भावपूर्ण आदरांजली वाहिली. पारनेर शहरात भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून त्यांना मानवंदना देण्यात आली. अमर रहे अमर रहे, वीज जवान अमर रहे, वंदे मातरम्, जय जवान जय किसान, भारत माता की जय या घोषणांनी पारनेर शहर व लोणी हवेली रस्ता दुमदुमून गेला होता. सुभेदार मोहन निलजकर यांच्यासह 13 जवान तसेच पोलीसांनी या वीर जवान साठे यांना मानवंदना दिली.

Video : डोंगराईचा हिरवा शालु व वाहणारे झुळूक पाणी

यावेळी आ. नीलेश लंके, तहसीलदारशिवकुमार आवळकंठे, कृषी बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, नगरपंचातयचे नगराध्यक्ष विजय औटी, उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, पोलिस निरीक्ष घनशाम बळप, गटविकास अधिकारी किशोर माने, दीपक लंके, नगरसेवक अशोक चेडे, जिल्हा सैनीक बोर्डचे शिंदे, कॅप्टन विठ्ठलराव वराळ, कारभारी पोटघन यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने अंत्यसंस्कार वेळी उपस्थित होते.

भंडारदराही निम्मे भरले! गोदावरीला पुर

वीर जवान साठे यांच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी व दीड वर्षाचा मुलगा व तीन महिन्याची मुलगी असा परिवार आहे. सन 2013 मध्ये सैन्यदलात दाखल झाल्यानंतर नाशिक तसेच जम्मू काश्मीर येथे सैन्यादलात 9 वर्षे सेवा बजावली आहे. साठे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी हवेली येथे झाले. माध्यमिक शिक्षण लोणेश्वर विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण न्यू आर्टस् काँलेज, पारनेर येथे झाले असून नाशिक येथे सैन्यात भरती होऊन सध्या -जम्मू काश्मीर येथे मराठा रेजीमेंट 203 अर्टलरी येथे कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरण आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या