Thursday, April 25, 2024
Homeनगरवीरजवान नवनाथ भुजबळ अनंतात विलिन

वीरजवान नवनाथ भुजबळ अनंतात विलिन

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

भारतीय सैन्य दलाच्या इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये कार्यरत असलेले व लेह-लडाख (जम्मू) येथे कर्तव्य बजावत असताना दि.10 मे रोजी वीर मरण प्राप्त झालेले नेवासा तालुक्यातील माका येथील जवान नवनाथ रंभाजी भुजबळ वय (वय 35 वर्ष) यांचे पार्थिवावर बुधवार दि.12 रोजी मध्यरात्री नेवासा तालुक्यातील माका येथे भुजबळ वस्तीवर लष्करी-शासकिय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देण्यात माका गावासह नेवासा तालुका साश्रूंयनांनी गहिवरला. कर चले हम फ़िदा जान-ओ-तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों… या गीताची प्रचिती नेमकी काय असते हे संपूर्ण नेवासा तालुक्याने पहिल्यांदाच अनुभवले.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील माका येथील जवान नवनाथ हे 15 दिवसांपूर्वी माका येथून ड्युटीवर गेले होते. नुकतीच त्यांची चंदीग हुन जम्मूला बदली झाली होती. लेह मधील त्यांचा ड्युटीचा पहिलाच दिवस होता. सोमवारी दि.10 मे रोजी सकाळी 6 वाजता सैन्य दलाकडून नवनाथच्या कुटुंबियांना मोबाईल वर फोन आला असता त्यांनी नवनाथला वीर मरण आल्याचे कळविले होते. हे वृत्त समजताच भुजबळ कुटुंबीय व माका गावावरच दुःखाचा डोंगरच कोसळला.

जवान भुजबळ यांना लेह-लडाख येथे कर्तव्य बजावत असताना सोमवार दि.10 मे रोजी सकाळी वीरमरण प्राप्त झाले होते. तेथील कार्यवाही व चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा पार्थिव बुधवार दि.12 मे रोजी विमानाने पुण्याला आणण्यात आला. पुण्याहून लष्करी वाहनाने बुधवारी रात्री उशिरा माका तालुका नेवासा येथे आणण्यात आला. रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल व शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगाव येथील 44 बटालीयनच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करून बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.

यावेळी इंडो तिबेट पोलीस फोर्सचे इन्स्पेक्टर अरविंद कुमार, हवालदार अरुण काळदाते, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, उपनिरीक्षक श्री. थोरात, माका येथील जवान शिंगाडे मेजर, म्हस्के मेजर, उपसरपंच सहदेव लोंढे, खंडुभाऊ लोंढे, ग्रामपंचयात सदस्य आदिनाथ म्हस्के, देविदास भुजबळ, संभाजी लोंढे , मच्छिन्द्र भुजबळ व पोलीस पाटील अशोक वाघमोडे यांनी पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली. करोना महामारीचे सर्व शासकीय नियमांचे पालन करून त्यांच्या कौटुंबांनी व ग्रामस्थानि पुष्पहार व गुच्छ पार्थिवावर ठेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

चुलत्याचे मदतीने 8 वर्षाचे चिमुकल्याने दिला वडिलांना अग्नी…

वीरजवान नवनाथ भुजबळ यांचे थोरले बंधू बाबासाहेब भुजबळ यांच्या मदतीने 8 वर्षीय मुलगा हर्षद नवनाथ भुजबळ याने आपल्या पित्याला अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवाला अग्नि दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या