Friday, April 26, 2024
Homeनगरविवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह राहात्यातील चारजणांवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह राहात्यातील चारजणांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

पुणे येथे घेतलेल्या फ्लॅटचे पैसे भरण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये आणावेत. म्हणून विवाहित तरुणीला शिवीगाळ करून तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. ही घटना राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथे घडली.

- Advertisement -

सौ. प्राजक्ता विक्रम पवार, रा. दुर्गापूर, ता. राहाता, हल्ली रा. मुंजोबानगर राहुरी बु. ता. राहुरी, या विवाहित तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 18 जानेवारी 2020 पासून ते नोव्हेंबर 2021 रोजीपर्यंत सौ. प्राजक्ता पवार ही तिच्या सासरी दुर्गापूर ता. राहाता येथे नांदत होती. दरम्यान पुणे येथे घेतलेल्या फ्लॅटचे पैसे भरण्यासाठी सौ. प्राजक्ता पवार हिने तिच्या वडिलांकडून अडीच लाख रुपये आणावेत. या कारणावरून तसेच घरातील बारीकसारीक गोष्टीवरून सौ. प्राजक्ता पवार हिला उपाशीपोटी ठेवले. तिला शिवीगाळ करून शारिरीक मानसिक छळ केला.

या सर्व त्रासाला कंटाळून सौ. प्राजक्ता विक्रम पवार हिने राहुरी पोलिसांत धाव घेऊन तिच्यावर होत असलेला अन्याय पोलिसांना सांगितला. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांत पती विक्रम मधुकर पवार, सासू पुष्पा मधुकर पवार, सासरा मधुकर बाबुराव पवार, दीर आशिष मधुकर पवार सर्व रा. दुर्गापूर, ता. राहाता जि. अहमदनगर या चारजणांवर गुन्हा रजि. नं. 484/2022 भादंवि. कलम 498, 427, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा प्रकार हा राहाता पोलीस ठाणे हद्दीत घडला असल्याने तिकडे वर्ग करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या