Wednesday, April 24, 2024
Homeनगरविवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासू-सासर्‍यावर राहुरीत गुन्हा दाखल

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासू-सासर्‍यावर राहुरीत गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

माहेरहून तीन लाख रुपये आणले नाहीतर तुला जिवंत मारून टाकू. अशी धमकी देऊन विवाहित तरूणीला अंगावरील कपड्यानीशी घरातून बाहेर हाकलून दिले. ही घटना राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासर्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोनाली महेंद्र संसारे, रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी, हल्ली रा. नांदगाव, ता. नगर या विवाहित तरूणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सोनाली या नांदगाव येथील तरुणीचा विवाह दोन वर्षापूर्वी राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथील महेंद्र संसारे या तरूणाबरोबर झाला. लग्न झाल्याच्या दोन महिन्यांनंतर आरोपी सोनाली हिला नेहमी म्हणायचे, तुझ्या आई-वडिलांनी लग्नात आमचा व्यवस्थित मानपान केला नाही. तसेच हुंडा देखील दिला नाही. आपल्याला घराचे काम करण्यासाठी तू तुझ्या माहेरहून तीन लाख रुपये घेऊन ये. या कारणावरून सोनाली संसारे हिला वेळोवेळी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच उपाशीपोटी ठेऊन तिचा मानसिक छळ केला. तू माहेरहून पैसे आणले नाहीतर तुला आम्ही जिवंत मारून टाकू. अशी धमकी देऊन, तू या घरात रहायचे नाही. असे म्हणून तिला अंगावरील कपड्यानीशी घरातून बाहेर हाकलून दिले. तिने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी पती- महेंद्र मधुकर संसारे, सासरा- मधुकर कोंडीराम संसारे, सासू- प्रभावती मधुकर संसारे सर्व रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी या तिघांवर गुन्हा रजि. नं. 573/2022 भादंवि. कलम 498(अ), 323, 504, 506 प्रमाणे मारहाण व छळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशांत दिवटे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या