Friday, May 10, 2024
Homeनगरलग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला तर त्यांच्या कुटुंबियांनी महिलेस मारहाण केली. या प्रकरणी सुपा पोलीसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

‘नागेबाबा’तील बनावट सोन्याची व्याप्ती वाढली

सतिश उत्तम जाधव, रेणुका सतिश जाधव, रंजना उत्तम जाधव व स्वप्निल उत्तम जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसर संशयित सतिश जाधव व पिडीत महिला हे दोघे सुपा येथे एका पेट्रोलपंपवार एकत्र काम करत आहेत. संशयित जाधव याने 2020 पासून ओळखीतून महिलेला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केले. महिला गरोदर राहिल्यावर तीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले.

‘त्या’ बिबट्यासोबत गावकर्‍यांचं फोटो सेशन, पुढे घडलं असं काही…

यानंतर जाधव हा टाळू लागल्याने रविवारी (दि.18) पिडीत महिला त्याच्या घरी गेली. येथे पिडीतेला संशयिताच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करत मारहाण केली. सुपा पोलिसांनी सदर पिडीत माहिलेच्या फिर्यादीवरुन सतिश उत्तम जाधवसह चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत. सतिश जाधव यास सुपा पोलिसांनी अटक केली असुन शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 27 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे पुढील तपास करत आहेत.

सुखसागरची जागा दीड महिन्यात मनपाच्या ताब्यात

- Advertisment -

ताज्या बातम्या