Friday, April 26, 2024
Homeनगरलग्नाळूंना गंडा घालणारी टोळी जेरबंद

लग्नाळूंना गंडा घालणारी टोळी जेरबंद

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

विवाहित महिलेशी लग्न (Married woman Marriage) लावून अडीच लाख रूपये उकळत पळून जाण्याच्या तयारीतील संशयित नवरी व इतर चार अशा पाच जणांच्या टोळीस (Gang) श्रीगोंद्यात (Shrigonda) नागरिकांच्या सतर्कतेने जेरबंद (Arrested) करण्यात पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -

नवरी काजल ऊर्फ कांचन अनिल श्रीवास्तव (19, रा. इकवार बाजार, वर्धा) तिचा पहिला पती अजित धर्मपाल पाटील (22, रा. कात्री पोस्ट, ता. हिंगणघाट, जि.वर्धा), बळीराम नरोजी नलबले (55, रा वाळकेवाडी ता.लोहा, जि. नांदेड), दिगांबर देवराव आंबुरे (35) व माधव काशीनाथ सवणे व (55, रा. दोघेही माळबोरगाव ता.किनवट जि. नांदेड) अशी अटक (Arrested) करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी रामदास शिवाजी साबळे (रा. भानगाव, ता. श्रीगोंदा) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांना लग्न (Marriage) करण्याच्या इराद्याने अडीच लाख रुपयांना फसवणूक (Fraud) करून विवाहित महिलेबरोबरच लग्न (Marriage) लावून देण्यात आले. ही विवाहित महिला (Marriage Woman) तिच्या पाहिल्या नवर्‍यासोबत पळून जाताना पकडल्यानंतर या टोळीचा पर्दापाश झाला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास साबळे यांचा विश्वास संपादन करून काजल श्रीवास्तव हिने लग्न (Marriage) केले होतेे. लग्नानंतर दोन दिवसांनी ती अजित धर्मपाल याचेसोबत निघून जात होती. साबळे व त्यांच्या नातेवाईक यांनी दोघांना पकडून पोलीस स्टेशनला (Police Station) घेवून आले. त्यांचेकडे पोलिसांनी चौकशी (Police Inquiries) केली असता त्यांनी फिर्यादी साबळे यांच्याशी लग्नाचा बहाणाकरुन अडीच लाख रूपये रोख घेतले. काजल या मुलीचे अधीच लग्न झालेले असतांना साबळे यांच्याशी बनावट विवाह लावला.

तिचा पती अजित हा लग्नामध्ये नवरीचा भाऊ म्हणून हजर होता. इतर तीन जणांपैकी एकजण मामा म्हणून तर दोघे नवरीचे काका म्हणून हजर लग्नाला हजर होते. या पाच जणांनी एकत्रीत कट करुन साबळे यांची फसवणुक केल्याची कबुली दिली आहे. सर्वांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधिक्षक आण्णसाहेब जाधव यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक फौजदार गावडे, कर्मचारी पुराणे, सुपेकर, साखरे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या