Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगर30 सप्टेंबरनंतरचे संचालक, सदस्य बाजार समितीच्या निवडणुकीला मुकणार

30 सप्टेंबरनंतरचे संचालक, सदस्य बाजार समितीच्या निवडणुकीला मुकणार

अहमदनगर| ज्ञानेश दुधाडे | Ahmednagar

जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांची निवडणुका जानेवारी 2022 मध्ये होणार आहेत. त्यासाठी मतदार यादी कार्यक्रम सहकार विभागाने हाती घेतलेला आहे. मात्र, पणन विभागाने निवडणूक प्रक्रियेत बदल केल्याने अर्हता दिनांकानंतर नव्याने निवडून येणारे सोसायट्यांचे संचालक, सदस्य यांना बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी करण्यासोबतच, मतदानालाही मुकावे लागणार आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांची आर्हता 30 सप्टेंबर 2021 असल्याने त्याआधी असणारे संचालक आणि सदस्य यांना निवडणूक लढविण्यास मतदानाचा अधिकार राहणार आहे. यामुळे नव्याने निवडून आलेले संचालक आणि सदस्य यांच्यावर अन्याय ठरवणार आहे.

- Advertisement -

पणन विभागाने बाजार समित्यांच्या निवडणूक कायद्यात काही बदल केलेले आहेत. त्या बदलानूसार येणार्‍या काळात बाजार समित्यांच्या निवडणूका होणार आहेत. त्यातील एका बदलानूसार आर्हता दिनांकानंतर नव्याने निवडून येणारे संचालक, सदस्य यांना बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदान आणि उमेवारी करता येणार नाही. आर्हता दिनांकापूर्वी असणारे जुने संचालक आणि सदस्य यांना ही संधी राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणूकांची तयारी सहकार खात्याने सुरू केली आहे. यात नगर आणि श्रीगोंदा वगळता उर्वरित सर्व बाजार समित्यांची निवडणूक जानेवारी महिन्यांत होणार आहे. मागील आठवड्यात यातील कोपरगाव, पारनेर, कर्जत आणि जामखेड बाजार समितीच्या मतदारांच्या यादी प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

उर्वरित ठिकाणाच्या मतदारसंघनिहाय याद्या सहकार विभाग मागवत असून त्यादेखील लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत प्रामुख्याने व्यापारी, हमाल मापाडी, सोसायट्या आणि ग्रामपंचायत सदस्य असे मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील सदस्य, संचालक यांच्यासाठी 30 सप्टेंबर 2021 ही अर्हता दिनांक आहे. या पूर्वीच्या पणन विभागाच्या कायद्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तीन दिवस आधीपर्यंत मतदार यादीत बदल करता येत होता. मात्र, आता तसे करता येणार नाही. सहकार खात्याने नुकत्याच चार बाजार समितीच्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिध्द केली असून त्यात नव्याने संचालक अथवा सदस्य झालेल्या सदस्यांची नावे मतदार यादीत येणार नाहीत. मतदार यादीत नाव न आल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकर्‍यांकडे अपील करावे लागणार आहे. संबंधीत अपीलावर निर्णय झाल्यानंतर तो विरोधात गेल्या संबंधीतांना न्यायालयाचा मार्ग निवडता येणार आहे.

…………….

………………..

………………

पणनच्या पूर्वीच्या कायद्यात पाच कोटींच्या पुढे उलाढाल असणार्‍या बाजार समित्याांची निवडणूक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होत असे. मात्र, पणनच्या नवीन कायद्यात आता सर्व बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सहकार विभागाच्या नियंत्रणात होणार आहेत. साधारणपणे फेबु्रवारी महिन्यांत नगर आणि श्रीगोंदा बाजार समितीची निवडणूक होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सरकारला लक्ष घालावे लागणार

साधारणपणे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका या जानेवारी महिन्यांत होणार आहेत. या निवडणुकांसाठी अर्हता दिनांक 30 सप्टेंबर असल्याने दरम्यानच्या काळात चार ते पाच महिन्यांत अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये नव्याने संचालक मंडळ अस्तित्वात येणार असले अथवा आलेले असले. या नवीन असणार्‍या संचालक आणि सदस्यांवर हा अन्याय असणार आहे. यामुळे राज्य सरकारला यात लक्ष घालून नव्याने निवडूण येणार्‍या संचालक आणि सदस्यांना न्याय द्यावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या