Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीगोंदा : लिंबू व्यापार्‍यांचे लायसन्स रद्द करणे उपसभापतीच्या अधिकाराबाहेर

श्रीगोंदा : लिंबू व्यापार्‍यांचे लायसन्स रद्द करणे उपसभापतीच्या अधिकाराबाहेर

श्रीगोंदा|प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदा कृषी उत्पन्नबाजार समितीच्या उपसभापती वैभव पाचपुते आणि सचिव दिलीप डेबरे यांच्या सहीने अकरा लिंबू व्यापारी यांचे लिंबू खरेदी लायसन्स रद्द करण्यात आले होते. लायसन्स रद्द करण्याचा अधिकार उपसभापती यांना नसल्याचे हे लायसन्स रद्द करू नये असे बाजार समितीचे संचालक धनसिंग भोईटे यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे केलेल्या अर्जात म्हंटले असून याबाबतचा निर्णय सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या कक्षेत येत नसल्याने याबाबतचा निर्णय जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे लागणार आहे.

- Advertisement -

बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते आणि सचिव यांनी अकरा लिंबू व्यापारी यांचे लायसन्स रद्द केले होते. मात्र याबाबत संचालक धनसिंग भोईटे पाटील यांनी या उपसभापती आणि सचिव यांचा निर्णय रद्द व्हावा यासाठी सहाय्यक निबंधक यांच्याकडे केला होता. यात म्हंटल्या प्रमाणे महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणना विकास व विनियमन अधिनियम 1963 ई व 1960 मधील तरतुदीनुसार बाजार समितीने अनुज्ञप्ती परवाना 15 दिवसांसाठी रद्द करणेचा किंवा निलंबित करण्याचा अधिकार सभापती व सचिव यांचे संयुक्त स्वाक्षरीने असून अशा कारवाई करण्यासाठी अनुज्ञप्ती धारकांना आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी देणे आवश्यक आहे. अनुज्ञाप्ती रद्द करण्याचा विषय मासिक सभेमध्येही मांडणे आवश्यक आहे.

परंतू बाजार समितीचे उपसभापती यांनी आपले पदाचा गैरवापर करुन अकरा जणांचे लायसन्स रद्द केले. ते पुन्हा द्यावेत असे भोईटे अर्जाव्दारे मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या