Friday, April 26, 2024
Homeनगरबाजार समितीच्या रिकाम्या जागेच्या वाद प्रकरणी कारवाईचे आश्वासन

बाजार समितीच्या रिकाम्या जागेच्या वाद प्रकरणी कारवाईचे आश्वासन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

बाजार समितीची शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जुन्या शाखेच्या रिकाम्या जागेच्या तक्रारीबाबत क्षेत्रीय अधिकारी एम.एम.कराळे यांनी चौकशी करून अहवाल पुढील कारवाईसाठी जिल्हा उपनिबंधक यांचेकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत कारवाई होणे अपेक्षीत असल्याचे लेखी अश्वासन सहाय्यक निबंधक बी.के.कोठुळे यांनी दिल्यानंतर गोरक्ष ढाकणे यांनी उपोषण स्थगित केले.

- Advertisement -

याबाबत ढाकणे रा.खेर्डे यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पाथर्डी यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. ढाकणे हे उपोषणस्थळी गेले असता त्यांना सहाय्यक निबंधक कोठुळे यांनी विनंती करत तक्रारीनुसार क्षेत्रीय अधिकारी एम.एम.कराळे यांनी चौकशी करून अहवाल पुढील कारवाईसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नगर यांचेकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत कारवाई होणे अपेक्षीत आहे.तसेच बाजार समितीकडून याबाबतचा खुलासा मागणी करून अवगत करण्यात येईल तरी उपोषणापासून परावृत्त व्हावे असे लेखी अश्वासन दिले. बाजार समितीची शहरातील जुन्या सेंट्रल बँकेच्या शाखेचे गाळे (जागा) रिकामे झाले असुन ते शेतीपुरक व्यवसायासाठी भाडेतत्वावर मिळावेत यासाठी ढाकणे यांनी 2015 मध्ये बाजार समीतीकडे अर्ज केला होता.

पाच वर्ष होऊनही बाजार समीतीने ढाकणे यांच्याशी याबाबत कसलाच प्रतिसाद दिला नाही.ढाकणे यांनी पुन्हा डिसेंबर 2020 रोजी या जागेसाठी 30 लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास तयार आहे, असा अर्ज बाजार समितीकडे केला होता. संचालक मंडळाने मासिक सभेत ऐनवेळच्या विषयात ठराव करून सदर जागा संदिप दगडूराम बाहेती (रा.पाथर्डी) यांना तीन लाख अनामत घेऊन भाडेतत्वावर दिली आहे. या जागेसाठी ढाकणे यांनी सर्वात प्रथम अर्ज करून मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार न करताच जागा भाडेतत्वावर देतांना पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या नियम व अटीचे पालन न करता भंग केलेला आहे. यामुळे ढोकणे यांनी न्यायासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या