Wednesday, April 24, 2024
Homeनगरबाजार समितीने बेकायदेशीर प्लॉटचे वितरण केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी

बाजार समितीने बेकायदेशीर प्लॉटचे वितरण केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मंजूर ले-आऊट असतानाही पणन संचालकांची परवानगी न घेता

- Advertisement -

कांदा व्यापार्‍यांना बेकायदेशीरित्या प्लॉटचे वितरण केलेले आहे. सदरचे वितरण केलेल्या प्लॉटचे वितरण त्वरीत रद्द करण्यात येऊन बाजार समिती व्यवस्थापनावर बेकायदेशीर काम केल्याबाबतची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन गुजर यांनी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीने श्रीरामपूर येथील चार ते पाच कांदा व्यापार्‍यांना बाजार समितीची मोक्याची जागा पणन संचालकांची परवानगी न घेता परस्पर बेकायदेशीररित्या वितरीत केली. संबंधित व्यापार्‍यांनी त्या ठिकाणी नकाशे मंजूर न करता काम सुरू केले आहे.

शासनाने यापूर्वीच बाजार समितीचे प्लॉट विना परवानगी देण्यास बाजार समित्यांना बंदी घातली आहे. तसेच संचालक मंडळाची मुदत संपलेली असताना न्यायालयाने दिलेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये सदरचे बेकायदशीर वर्तन करणार्‍यांविरुध्द त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणीही श्री. गुजर यांनी केली आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मंजूर ले-आऊट असतानाही पणन संचालकांची परवानगी न घेता कांदा व्यापार्‍यांना बेकायदेशीरित्या प्लॉटचे वितरण केलेले आहे. सदरचे वितरण केलेले प्लॉटचे वितरण त्वरीत रद्द करण्यात येऊन बाजार समिती व्यवस्थापनावर बेकायदेशीर काम केल्याबाबतची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन गुजर यांनी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या