Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेश... यामुळे बंद पडलं Whatsapp, Facebook आणि Instagram; झुकेरबर्गच झालं तब्बल 'इतक्या'...

… यामुळे बंद पडलं Whatsapp, Facebook आणि Instagram; झुकेरबर्गच झालं तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींचं नुकसान

दिल्ली | Delhi

WhatsApp, Facebook आणि Instagram कडून सुमारे ७ तासांपेक्षा अधिक तासांच्या प्रतिक्षेनंतर मंगळवार (5 ऑक्टोबर) च्या सकाळी सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. जगभरात काल रात्री फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप ठप्प झाल्याने युजर्सनी संताप व्यक्त केला होता. जगभरात कुठेच अ‍ॅप किंवा वेबसाईट अशा कुठेच WhatsApp, Facebook, Instagram वापरता येत नव्हते पण आता ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. पण कोट्यवधी युजर्सचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अशाप्रकारे बंद होण्यामागे नेमकं काय घडलं याचे कारण समोर आले आहे.

- Advertisement -

Facebook, WhatsApp आणि Instagram या तीनही प्लॅटफॉर्म कंपनीच्या डोमेन नेम सिस्टममध्ये आलेल्या त्रुटीमुळे बिघाड झाला होता. त्यामुळे फेसबुकच्या मालकीचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ठप्प झाले असल्याची माहिती मिळते आहे. हे एक असं टूल आहे, जे Facebook.com सारख्या वेब डोमेनला एका इंटरनेट प्रोटोकॉल किंवा IP Address मध्ये बदलतो.

सोमवारी फेसबुकच्या DNS रेकॉर्ड्समुळे बिघाड झाला. ज्यावेळी DNS ची चूक असते, त्यावेळी Facebook.com युजरचं प्रोफाइल पेज बनणं अशक्य होतं. DNS इंटरनेटचं फोनबुक आहे, तर BGP पोस्टल सेवा आहे. ज्यावेळी एखादा युजर इंटरनेट डेटामध्ये एन्ट्री करतो, त्यावेळी ब्रॉडर गेटवे प्रोटोकॉल म्हणजेच BGP मार्ग ठरतो, जिथे डेटा ट्रॅव्हल करू शकतो. फेसबुक लोडिंग थांबण्याच्या काळी मिनिटं फेसबुकच्या ब्रॉडर गेटवे प्रोटोकॉल-BGP मार्गात बदल करण्यात आले होते. त्यामुळे आता BGP तील बिघाडचं सांगू शकतो, की फेसबुक DNS का फेल झालं. कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

WhatsApp, Facebook आणि Instagram सेवा ठप्प झाल्याचा मोठा फटका मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) याला बसला असून या सहा तासात त्याची संपत्ती ६०० कोटी डॉलर्स म्हणजे जवळपास ४५ हजार ५५५ कोटी रुपयांनी कमी झाली आहे. एका रिपोर्ट नुसार मार्कचे जागतिक श्रीमंत यादीतील स्थान एक नंबरने घसरून तो आता बिल गेट्स यांच्या खालच्या नंबरवर गेला आहे.

भारतातील सरकारी आकडेवारीनुसार Facebook चे ४१ कोटी, WhatsApp चे ५३ कोटी तर Instagram चे २० कोटी युजर्स आहेत. फेसबुकचा विचार केला तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्व्हर स्लोडाऊन होता. 2019 सालीही फेसबुकला अशा स्थितीचा सामना करावा लागला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या