Thursday, April 25, 2024
Homeजळगाव50 लाखांसाठी विवाहितेचा छळ

50 लाखांसाठी विवाहितेचा छळ

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

प्लॉट घेण्यासाठी माहेरुन 50 लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी

- Advertisement -

दिल्याप्रकरणी सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील रहिवासी राधा राजेंद्र डौरे हिने प्लॉट घेण्यासाठी माहेरुन 50 लाख रुपये आणावे यासाठी नाशिक येथील तीच्या सासरच्या लोकांनी तिच्या अंगावरील दागिने काढून, मारहाण व शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत राधा डौरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र दौलत डौरे, दौलत पांडुरंग डौरे, मिराबाई पांडुरंग डौरे, सर्व रा.पंचवटी नाशिक, योगिता दिनेश पवार, दिनेश धुडकू पवार, संतोष लक्ष्मण भदाणे रा.देवळा, प्रणव सोपान डौरे रा.नाशिक यांच्याविरुद्ध भादंवि कलम 498, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ वळवी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या