Friday, April 26, 2024
Homeजळगावमार्च एंडिंगचा फिव्हर...

मार्च एंडिंगचा फिव्हर…

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

वित्तीय वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे बँकांसह शासकीय कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगचा फिव्हर दिसून येत आहे. त्यामुळे अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची चांगलीच लगबग सुरु आहे.

- Advertisement -

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमिवर शासकीय कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती असल्यामुळे कर्मचार्‍यांवर ताण येत असल्याचेही बोलले जात आहे. कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद यासह बँकांमध्ये मार्च एंडिंगचा फिव्हर दिसून आला.

कोषागार कार्यालय

विविध शासकीय योजनांचे बीले काढण्यासाठी कोषागार कार्यालयात मोठी गर्दी दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अन्य योजनांचे अनुदान बंद करण्यात आले असलेतरी अत्यावश्यक सेवेच्या वैद्यकिय तसेच कोविडचे बीले काढण्यासाठी कोषागार कार्यालयात गर्दी आहे. मंगळवारी जवळपास 174 बीले आल्याचे कोषागार अधिकारी प्रविण पंडित यांनी सांगितले.

महानगरपालिका कार्यालय

मार्च अखेर मालमत्ता कराची 100 टक्के वसूलीचे उद्दीष्ट असलेतरी जवळपास 70 टक्के मालमत्ता कराची वसुली यंदा झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिकेने ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. तसेच मालमत्ता कर भरणार्‍यांना पाच टक्के बिलात सूट दिली होती. त्यामुळे कर दात्यांनी जवळपास 70 टक्के भरणा केल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली. विविध शासकीय योजनांमधून तसेच महानगरपालिकेच्या फंडातून झालेल्या विकास कामांचे बीले काढण्यासाठी आता गर्दी झाली आहे. त्यामुळे जवळजवळ आलेला निधी खर्च झाला आहे. विविध योजनांमधून विकासकामे करण्यात आली आहे. त्याची बीले काढण्यासाठी ठेकेदांरांनी आज मनपात गर्दी केली होती.

जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेत मार्च एंडिंगमुळे लोकप्रतिनिधींसह ठेकेदारांची गर्दी झाली होती. कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हा परिषदेत आरोग्य विभाग वगळता अन्य विकासाच्या योजनांना बे्रक लागला आहे. सन 21-22 या वित्तीय वर्षांसाठी 16 कोटी तुटीचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या विविध योजनांची कामे मार्गी लावण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांवरील निधीला प्रशासकीय मान्यता देवून खर्चाचा लेखाजोखा सादर करण्यात येणार असल्याची माहिती जि.प.चे वित्त व लेखाधिकारी विनोद गायकवाड यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय

मार्च एंडिंगमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची धावपळ सुरु झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लावण्यात आलेले कडक निर्बंध तसेच होळी आणि धुलिवंदनाच्या सुटीमुळे अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर अधिक ताण जाणवू लागला आहे. वर्षभरात शासकीय योजनांचे झालेल्या कामांचा लेखाजोखा तयार करण्याचे काम सुरु आहे.

सहकारीसह राष्ट्रीयकृत बँक

सहकारी सोसायट्यांसह राष्ट्रीयकृत बँकांचा आर्थिक वर्षांचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बँक अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची लगबग दिसून आली. 1 एप्रिलपासून नविन आर्थिक वर्षाला सुरुवात होत असलीतरी 1 एप्रिलला बँकांना सुटी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या