Friday, April 26, 2024
Homeनाशिकमॅरेथॉन स्पर्धा राज्यात आदर्शवंत : आ. हिरामण खोसकर

मॅरेथॉन स्पर्धा राज्यात आदर्शवंत : आ. हिरामण खोसकर

हरसूल । वार्ताहर Harsul

‘विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ आणि वाव मिळावा, यातून खेळाडूवृत्ती विद्यार्थी घडावेत, गावाचे नाव जगाच्या नकाशावर या विद्यार्थांनी (students) पोहचविण्यासाठी हरसूल (harsul) गटाच्या जिल्हा परिषद सदस्या इंजि.रुपांजली माळेकर (Zilla Parishad Member Eng. Rupanjali Malekar) यांनी संकल्पनेतुन प्रेरणादायी भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे (Grand marathon competitions) आयोजन करून विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि ध्येय गाठण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामुळे राज्यात हरसूल जिल्हा परिषद गटाच्या भव्य मरेथॉन स्पर्धा आदर्शवत ठरतील’, असे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी केले.

- Advertisement -

हरसूल जवळील सारस्ते येथे हरसूल गट जिल्हा परिषद अंर्तगत भव्य मॅरेथॉन स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपत सकाळे, जि. प. सदस्या रुपांजली माळेकर, नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, शिक्षणाधिकारी अनिल शहारे, युवा नेते मिथुन राऊत, शिक्षण विस्तारअधिकारी राज आहेर, सरपंच जानकीराम गायकवाड, पोलीस पाटील दिनकर चौधरी, उपसरपंच चांगदेव माळेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवीत स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.

यावेळी खुल्या गटांसह 15 वर्षाखालील स्पर्धा संपन्न झाल्या.हरसूल हा भाग नेहमीच खेळाडूची खाण निर्माण करत असून अनेक खेळाडू हरसूल भागातून घडले आहे. उद्याचे भवितव्य विद्यार्थ्यांनी ओळखून आपल्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी हरसूल जिल्हा परिषद गटात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंनी या स्पर्धेत हिरारीने सहभाग नोंदवीत अंगभूत खेळाडूवृत्तीला तितकाच वाव दिल्याने खर्‍या अर्थाने ह्या भव्य मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी आणि प्रेरणादायी ठरल्याचे जि. प.सदस्या रुपांजली माळेकर यांनी सांगितले.

त्याच बरोबर याच भागातून आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (International runner Kavita Raut), ताई बामणे, वर्षा चौधरी, दयानंद चौधरी सारखे खेळाडू घडले आहेत. म्हणूनच हरसूल भागाला खेळाडूंची खाण असे म्हटले जात असल्याचे प्रतिपादन इंजि. रुपांजली माळेकर यांनी केले. यावेळी विजेत्या खेळाडूना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, मेडल, ट्रॉपी तसेच रोख रक्कम देण्यात आली. यावेळी उपसरपंच चांगदेव माळेकर, स्वप्नील माळेकर, सुरेश गायकवाड, अनिल बोरसे, रामदास गायकवाड, मनोहर गायकवाड, निवृत्ती चौधरी, प्रदीप माळेकर,

विष्णू गायकवाड, परशराम मोंढे, गणेश मौळे, सोमनाथ चौधरी, पांडुरंग माळेकर, अरुण आसम, विलास राऊत, योगेश आहेर, प्रशांत चौधरी, मोहन बेडकोळी, रघुनाथ पोटींदे, विलास चौधरी, निलेश चौधरी, जगन पिपळके, वामन खरपडे, विष्णू बेडकोळी, माजी मंडळ अधिकारी पांडुरंग बोरसे, मुख्याध्यापक दिगंबर भुसारे, क्रीडाशिक्षक भगवान हिरकुड, शांताराम शेंडे आदींसह खेळाडू, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रा. गणेश बारगजे, विठ्ठल मौळे यांनी केले तर आभार अनिल बोरसे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या