मराठी नवीन वर्ष स्वागत, टीम चामरलेणीसह डोंगरावर लावली देशी वृक्षांची रोपे

jalgaon-digital
1 Min Read

इंदिरानगर l Indira nagar (वार्ताहर ):

ग्रीन रेवोल्युशन टीमचे सदस्य नितीन जगदाळे यांनी मराठी नववर्षाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने साजरी केला करोनाचा प्रभाव पाहता देशात पर्यावरणात निर्माण झालेली ऑक्सिजनची कमतरता पाहता भविष्यात नवीन पिढीला अधिकाधिक ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, या उद्देशाने देशी वृक्षांच्या रोपांची खरेदी केली.

गुढीपाडव्याच्या दिवशी चामरलेणी येथे कार्यरत वृक्षमित्र टीमच्या आपल्या सहकाऱ्यांसह कडुनिंब, हिरडा, बेहडा, आवळा, जांभूळ, आंबा, पेरू, सीताफळ, बकुळ, वड, काळाकोंडा, काटेसावर पाडळ, ई. देशी रोपे लावून पक्ष्यांना अन्न व निवारा मिळावा, तसेच जैवविविधता टिकून रहावी या ऊद्दशासह आजचा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

यावेळी टीम चामरलेणी चे सदस्य सागर शेलार, किरण काकड, महादू स्वामी, सचिन शिराळ, तुषार पिंगळे, रवीं बरसाट, पंकज भगत, आशिष प्रजापति, तानाजी पिगळे, आदी सभासद हजर होते. पाडव्याच्या दिवशी जगदाळे परिवाराने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *