Friday, April 26, 2024
Homeनाशिकसंमेलन दिनदर्शिकेचा उपक्रम स्तुत्य

संमेलन दिनदर्शिकेचा उपक्रम स्तुत्य

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक Nashik येथे होत असलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 94th All India Marathi Literary Convention निमित्ताने नाशिकच्या साहित्यिकांच्या संदर्भात ‘मराठी साहित्य संमेलन दिनदर्शिका 2022’ हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे नवीन पिढीला नाशिकच्या साहित्यिकांची माहिती होण्यास अधिक मदत होईल, असे विचार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी नाशिक येथे व्यक्त केले.

- Advertisement -

हॉटेल संस्कृतीच्यावतीने Hotel Sanskruti तयार करण्यात आलेल्या ‘मराठी साहित्य संमेलन दिनदर्शिका 2022’ चे प्रकाशन संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार छगन भुजबळ यांच्याहस्ते कुसुमाग्रजनगरी Kusumagraj Nagari येथे संपन्न झाले, त्यावेळी प्रसिद्ध साहित्यीक डॉ. कैलास कमोद, संस्कृती अकादमीचे अध्यक्ष शिवाजी मानकर, संस्कृती हॉटेलचे संचालक दिग्विजय मानकर, संस्कृतीचे महाव्यवस्थापक दत्तात्रय शेवाळे उपस्थित होते.

या दिनदर्शिकेत नाशिक जिल्हयातील प्रसिद्ध साहित्यीकांचे छायाचित्र व माहिती देण्यात आली आहे त्यांत प्रसिध्द कवी गोविंद, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवीवर्य कुसुमाग्रज, प्रसिद्ध नाटककार वसंतराव कानेटकर, साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक, स्वातंत्रवीर विदा सावरकर, प्रसिद्ध कथाकार विमादी पटवर्धन, साहित्यीक बाबुराव बागुल, लोककवी वामनदादा कर्डक, कवी चंद्रशेखर, कवी सोपानदेव चौधरी, कवी कृ. ब. निकुंब, विनोदी साहित्यीक डॉ. अ.वा. वर्टी, आदी साहित्यीकांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या