Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमनसे आक्रमक : अ‍ॅमेझॉनच्या पुणे, मुंबईतील कार्यालयांची तोडफोड

मनसे आक्रमक : अ‍ॅमेझॉनच्या पुणे, मुंबईतील कार्यालयांची तोडफोड

मुंबई –

अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळासह अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा ही मनसेची मागणी फेटाळत राज ठाकरेंना थेट न्यायालयात खेचल्यानं

- Advertisement -

अ‍ॅमेझॉनविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पवई आणि साकीनाका परिसरातील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे आणि चांदिवलीतील कार्यालयाचीही तोडफोड

केल्याची घटना घडली आहे.

अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली होती. सुरुवातीला या मागणीबाबत सकारात्मकता दाखवणार्‍या अ‍ॅमेझॉनने नंतर मात्र मराठीच्या वापराला नकार देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोर्टात खेचलं. या प्रकरणी दिंडोशी न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्ते अ‍ॅमेझॉनविरोधात आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेबाबत घेतलेल्या भूमिकेवर मनसेनं नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन अशा मजकूराचे पोस्टर्स मुंबईभर लावले होते. चेंबूर परिसरातील बस स्थानकातील आणि बसवरच्या अ‍ॅमेझॉनच्या जाहिराती मनसे कार्यकर्त्यांनी फाडल्या होत्या. सोशल मीडियावर बॅन अ‍ॅमेझॉन अशा प्रकारची मोहीम सुरु करण्यात आली होती. ममहाराष्ट्रात फक्त मराठी. इथून पुढे तुमची डिलिव्हरी, तुमची जबाबदारी… असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉन विरोधात शड्डू ठोकला आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर केला नाही तरी चालतो, तसा कोणताही कायदा नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅमेझॉननं कोर्टात केलेला आहे. अ‍ॅमेझॉनला तेवढ्याच ताकतीनं उत्तर देण्यासाठी मनसेच्या कायदे तज्ञांची टीम सक्रिय झालेली आहे. आता हे प्रकरण थेट कोर्टात गेलंय. मनसेच्या खळ्ळखट्याकन स्टाईल उत्तरानं मनसे-अ‍ॅमेझॉन वाद जास्तच चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, अ‍ॅमेझॉनच्या वतीनं त्या-त्या राज्यांत संबंधित भाषेचा पर्याय उपलब्ध करुन दिला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या