मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘देशदूत’ चे वाचन

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व नवीन माध्यमिक विद्यालयात शुक्रवार दि.27 फेब्रुवारी रोजी ‘मराठी राजभाषादिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी खान्देशातील अग्रगण्य असलेले मराठी दैनिक म्हणून ‘देशदूत’चे वाचन केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, निलेश नाईक यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीत लेखनिक भूषण बर्‍हाटे यांच्या हस्ते वि. वि. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.

मराठी राजभाषादिननिमित्त विद्यालयाातील बालवाडी, 1 ली ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.

यामध्ये वक्तृत्व, वेशभूषा, कवितागायान, निबंध, घोषवाक्य, कथाकथन आदी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता निकम यांनी केले. ‘मराठी माणसांनीच मराठीला जिवंत कसे ठेवले पाहिजे, मराठी शाळा वाढवणे’ असे मार्गदर्शन मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र वारके, उज्ज्वला जाधव, वंदना नेहेते, श्रीकांत पाटील, रशिदा तडवी, राजेंद्र पवार, सुवर्णा सोनार, ज्योती सपकाळे, छाया पाटील, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *