Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुक्त विद्यापीठ प्रांगणात मराठी भाषा भवन : सामंत

मुक्त विद्यापीठ प्रांगणात मराठी भाषा भवन : सामंत

नाशिक / नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik / Nashikroad

मराठी भाषेला (Marathi language) अभिजात भाषेचे दर्जा लवकरच मिळेल. नाशिककरांची भावना आहे की, नाशिक परिसरात मराठी भाषा भवन (Marathi Bhasha Bhavan) उभारले पाहिजे. यासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या (ycmou) प्रांगणात मराठी भाषा भवन उभारणीचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे….

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाणार आहे. मात्र, त्यावेळी नाशिक महापालिकेचा महापौर हा शिवसेनेचा (Shivsena) राहील, असा विश्वास उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केला.

शालिमार येथील शिवसेना भवन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपनेते सुनील बागूल, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमूख विजय करंजकर, महानगरप्रमूख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख विनायक पांडे, दत्ताजी गायकवाड, मुशिर सय्यद, भाऊ पाटील, आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सामंत यांनी राज्याला शिक्षणाची वेगळी परंपरा असल्याने विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षांची मागणी असतानाही आपण ऑफलाईन परिक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

करोनामुळे (Corona) मुलांची घुसमट झालेली आहे. त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्याच्या उद्देशाने महाविद्यालयामध्ये तीन दिवसांचे सांस्कृटिक महोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महोत्सवात कला, क्रीडा व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

शिवसेनेने आपले अस्तित्व देशभरात पसरवण्यास सुरूवात केली असून, विविध राज्यांच्या निवडणूकांमध्ये उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्याठिकाणी ते निवडून येतील किंवा नाही मात्र त्या ठिकाणी लोकांनी शिवसेनेला स्विकारल्याचे स्पष्ट होत असल्याचे सामंत यांनी सांगितले.

सुरूवातीला सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विजय करंजकर, भाऊसाहेब चौधरी, सुनील बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी, शिवसैनिक, महिला सैनिक व युवा सेनेचे सदस्य मोठ्या संख्यने उपस्थित होते.

गटबाजीला कानपिचक्या

शिवसेनेचे नाशिकमधील वातावरण चांगले असल्याचे समजले प्रत्यक्षात शिवसेनेंतील गटबाजी बाजूला ठेवली गेली तर शिवसेनेचा पराभव कोणीच करु शकणार नसल्याचे सांगून ना.उदय सामंत यांनी शिवसैनिकांना कानपिचक्या दिल्या.

मुख्यमंत्री ठाकरे नंबर वन

दोन महिन्यांपूर्वी राज्या-राज्यांत सर्व्हेक्षण झाले. त्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देशात चवथ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरले. चारच दिवसापूर्वी नव्याने झालेल्या सर्व्हेक्षणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा प्रथम क्रमांक असल्याचे नमुद करण्यात आले. यातूनच राज्य सरकारच्या कामाचा दर्जा अधोरेखित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या