Wednesday, April 24, 2024
Homeनगरअनाथ गाडे कुटूंबांला 'मराठा वर्ल्ड' टीमची मदत

अनाथ गाडे कुटूंबांला ‘मराठा वर्ल्ड’ टीमची मदत

शेवगाव l तालुका प्रतिनिधी l Shevgaon

मोठया मुलीचे लग्न जवळ आल्याने खरेदीसाठी दुचाकीवर निघालेल्या आई वडीलांचा अपघाती मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथील अनाथ झालेल्या दोन बहिणी व एका भावंडाच्या मदतीसाठी शेवगाव येथील मराठा वर्ल्ड टीमचे सदस्य धावून येत रोख रक्कम, फळे व संसारउपयोगी साहित्य भेट देवून अनाथ कुटूंबाला आधार दिला आहे.

- Advertisement -

पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथील मोलमजूरी करुन संजय व योगिता गाडे हे दामप्त्य आई कलाबाई, वडील भिमराज, पदवीचे शिक्षण घेत असलेली मोठी मुलगी ऋतूजा, बारावीत असलेली मुलगी प्रतिक्षा व दहावीत असलेला छोटा मुलगा धनंजय या कुटूंबातील सदस्यांच्या उदर्निवाहाची सर्व जबाबदारी पार पाडत होते. अवघी १० गुंठे जमीन असलेल्या या कुटूंबाच्या नशिबी गरिबी पाचवीला पुजलेली होती. या सर्वांवर मात करुन संजयने कुटूंबाची जबाबदारी लिलला पार पाडली. मोठी मुलगी ऋतूजा हिचा विवाह पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिपंळगाव येथील जयदीप आरोळे या युवकाशी जुलै महिन्यात ठरलेला होता. त्यासाठी संजय व योगिता हे पती पत्नी पागोरी पिंपळगाव येथे लग्नाच्या खरेदीसाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. कोरडगाव शिवारात त्यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाची जोराची धडक बसली. या धडकेत दोघे पती पत्नी जागीच मृत्यूमुखी पडले. हा अपघात सुखाचे सर्व क्षण बाजूला ठेवून तीन भावंडांना कायमचे दु:खाच्या घाईत लोटून गेला. ती मुले आई वडील गेल्याने अनाथ झाली.

शेवगाव येथील मराठा वर्ल्ड टीमचे सदस्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून निधी जमा करुन गाडे कुटूंबातील दोन नंबरची मुलगी प्रतीक्षा व मुलगा धनंजय यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी १५ हजार रुपये असे तीस हजार रूपये टाकले. त्याच्या पावत्या, फळे व मिठाई गाडे कुटूंबाच्या घरी जावून कुटूंबाकडे या सदस्यांनी दिली.

तसेच मोठी मुलगी ऋतूजा हिचा दि.३० आँगस्ट रोजी जयदीप आरोळे या युवकाशी होणा-या विवाह प्रसंगी संसारउपयोगी साहीत्य देण्यात येणार आहे. शेवगाव येथील माजी प्राचार्य दिलीप फलके यांनी मुलगा धनंजय याच्या शालेय शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तसेच वाघोली येथील युवक कार्यकर्ते उमेश भालसिंग हे वैयक्तिक ऋतूजाच्या लग्नातील संपूर्ण जेवणाचा खर्च करणार आहेत.

ऋतूजाचा विवाह आई वडीलांशिवाय होणार असून समाजातील दानशूर व्यक्तींमुळे या दामप्त्यांसह दोन्ही भावंडांन बळ देणार ठरेल. या गाडे कुटूंबाच्या मदतीसाठी समाजातील आणखी दानशूर व्यक्तींनी पुढे येवून मदत करावी असे आवाहन मराठा वर्ल्ड टीमने केले आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या