Thursday, May 2, 2024
Homeनगरमराठा समाजाचा अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा

मराठा समाजाचा अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा

अकोले |प्रतिनिधी| Akole

मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी अकोले येथे सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

- Advertisement -

यावेळी तालुक्यातील आजी-माजी आमदारांना मराठा समाजाची मते चालतात पण मराठा आरक्षणप्रश्नी होत असणार्‍या आंदोलनात ते सहभागी होत नाहीत की पाठिंबा देत नाही यासंदर्भात शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रारंभी महात्मा फुले चौकातून शांततेच्या मार्गाने मोर्चास सुरूवात झाली. शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून खटपट नाकामार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत राज्य शासनामार्फत कोणत्याही प्रकारच्या शासकीय भरत्या करू नयेत, भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात याव्यात, एस.इ.बी.सी. अंतर्गत राज्य सरकारने व मा. उच्च न्यायालयाने जाहीर केल्याप्रमाणे शिक्षणामध्ये 12% व नोकरीमध्ये 13% आरक्षण मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने तातडीची तरतूद करावी, सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकार व मराठा संघटना यांनी एकत्र येऊन एकत्रित केस चालवावी, सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, मराठा आंदोलकांवर दाखल केलेले सर्व प्रकारचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, या मागण्यांचे निवेदन मराठा बांधवांच्यावतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले.

सकल मराठा समाजाच्यावतीने 10 तारखेचा हा मोर्चा प्रतिनिधीक स्वरूपात असला तरी अकोले तालुक्यात 17 ऑक्टोबर रोजी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तालुका व्याप्ती असणारे मोठे आंदोलन होणार आहे.

यावेळी अगस्ति कारखान्याचे संचालक व शिवसेना नेते महेशराव नवले, उद्योजक सुरेश गडाख, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, संभाजी ब्रिगेडचे राज्य समन्वयक डॉ. संदीप कडलग, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब उर्फ लालूशेठ दळवी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप शेणकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर, शिवशाहीर इंजि. मुकुंदा भोर, आदींची भाषणे झाली.

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ता नवले, संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ नवले, सेनेचे शहर प्रमुख नितीन नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश खांडगे, विनोद हांडे, विकास बंगाळ, संदीप शेणकर, महिलाध्यक्षा सौ. स्वाती शेणकर, गौरी शेटे, प्रशांत देशमुख, गणेश तोरमल, रोहिदास सोनवणे, अक्षय बोंबले, जालिंदर बोडके, ज्ञानेश्वर गोडसे, वैभव गोडसे, ऋषी लांडे, अक्षय धुमाळ, कौस्तुभ आवारी, शुभम माने, तुषार भांड, संदीप नवले आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन सुरेश नवले यांनी केले तर आभार सचिन नरवडे यांनी मानले. पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व उपनिरीक्षक दीपक ढोमने यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रारंभी पोलिसांच्यावतीने आंदोलनातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी 149 प्रमाणे नोटिसा दिल्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या