Wednesday, April 24, 2024
Homeनगरमराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर

मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

उपोषणादरम्यान सरकारचे अनेक डाव हाणुन पाडले. 14 तारखेला सरकारची मुदत संपत आहे. त्याबरोबर मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहचली असून अंतिम धक्क्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असे आवाहन मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी येथे केले.

- Advertisement -

पाथर्डी येथे झालेल्या मराठा आरक्षण सभेत ते बोलत होते. पाथर्डी येथील स्व.वसंतराव नाईक चौकात जरांगे यांचे स्वागत सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले. जरांगे व त्यांच्या सहकार्यांचे जेसीबीने फुले उळधळून व फटाक्यांची आतषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले. तालुक्यातील विविध गावांत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून महिला व पुरुषांनी फुलांची उधळण करत स्वागत केले. एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी पाथर्डी परिसर दणाणून गेला होता.

जरांगे महणाले, काहीही झाले तरी मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय आपण शासनाला शांत बसू देणार नाही. ओबीसी प्रमाणपत्र सर्वांना मिळवूनच राहू. मराठा आरक्षणाचा आपला लढा शांततेच्या मार्गाने चालू ठेवा. माझ्या कोणत्याही बांधवाने यासाठी आत्महत्या करू नये, अशी विनंती जरांगे यांनी केली. आपण गावोगावी जाऊन मराठा समाजाला जागृत करण्याचे काम करत आहे. यावेळी विष्णुपंत अकोलकर, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, उद्धव माने, सचिन वायकर , संदिप काटे, सोमनाथ बोरुडे, बबलु वावरे, नगरसेवक बंडुपाटील बोरुडे, गोकुळ दौंड, दादासाहेब डांगे, सोमनाथ अकोलकर, डॉ.रामदास बर्डे, सोमनाथ माने, प्रताप एकशिंगे, सिताराम बोरुडे, देवा पवार, लालाभाई शेख, संदीप काटे, दिलीप गायकवाड, भिमाजी कचरे, आप्पासाहेब बोरुडे, नानासाहेब बालवे, दिलीप बोरुडे, सुनिल कदम, बन्सी आठरे, जमीर आतार, नासीरभाई शेख उपस्थीत होते.

आठ तासानंतर…

दुपारी दोन वाजता होणारी पाथर्डीतील सभा रात्री साडेनऊ वाजता सुरु झाली. सकल मराठा समाजाचे युवक व तालुक्यातून आलेले विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या