Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण परिषद रद्द

मराठा आरक्षण परिषद रद्द

पुणे (प्रतिनिधि) –

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली मराठा आरक्षण परिषद रद्द

- Advertisement -

करण्यात आली आहे.

पुण्यातील रेसिडनसी क्लबमध्ये आज (शुक्रवार 30 ऑक्टोबर) परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन ते पाच या वेळेत मराठा आरक्षणाबाबत मंथन करण्यात येणार होते. मात्र, उदयनराजेंनी निरोप दिल्यानंतर पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मराठा आरक्षण परिषदेला याचिकाकर्ते आणि काही वकिलांचीही उपस्थिती असणार होती. उदयनराजे मराठा आरक्षणाची सद्यस्थिती समजून घेणार होते. मात्र आता ही बैठक कधी होणार, हे अस्पष्ट आहे.

याआधी, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी नवी मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण बैठकीला भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे पोहोचले होते, तर उदयनराजे भोसले यांनी दांडी मारली होती. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये या बैठकीचं आयोजन केलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या