Wednesday, April 24, 2024
Homeनगरजरांगेंपाठोपाठ भुजबळही येणार नगरमध्ये..!

जरांगेंपाठोपाठ भुजबळही येणार नगरमध्ये..!

अहमदनगर (प्रतिनिधी)

मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी प्राण पणाला लावलेले जालन्याचे मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये म्हणून प्रखर विरोध करणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ येणारे दोन दिवस नगर गाजवणार आहेत. आज शनिवारी (7 ऑक्टोबर) जरांगेंची सभा नगरला होणार असून, त्यानंतर लगेच उद्या रविवारी (8 ऑक्टोबर) मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत शब्दगंध संमेलनाचा समारोप होणार आहे. दोन्ही कार्यक्रमांतून मराठा व ओबीसी विषयांवर भाष्य होणार असल्याने नगर शहराकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील यांची आज शनिवारी 7 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता त्यांची सभा नागापूर एमआयडीसीतील निंबळक रस्त्यावरील रेणुकामाता मंदिरासमोरील मंगल कार्यालयात होणार आहे. सकल मराठा समाजाने या सभेचे नियोजन केले आहे. जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याची मागणी जोरकसपणे केल्याने ओबीसी समाजातून विरोध होऊ लागला आहे. मंत्री भुजबळही आक्रमक आहेत. जरांगे यांची नगरमधील सभा झाल्यावर दुसर्‍या दिवशी म्हणजे रविवारी मंत्री भुजबळ नगरला येणार आहेत. त्यादिवशी सायंकाळी आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित शब्दगंध साहित्य संमेलनाचे पारितोषिक वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. जरांगेंच्या भूमिकेविरुद्धची भूमिका ते मांडण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खा. डॉ. सुजय विखे हे दोघेही रविवारी सकाळी नगरमध्ये आहेत. त्यांच्या उपस्थितीत सावेडीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच आज सकाळी शब्दगंध साहित्य संमेलन उद्घाटनास कृषी मंत्री धनंजय मुंडे येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या