Thursday, April 25, 2024
Homeजळगावमराठा बटालियन सुवर्ण महोत्सव ; १९७१ च्या युद्धात सहभागी सैनिकांचा सन्मान

मराठा बटालियन सुवर्ण महोत्सव ; १९७१ च्या युद्धात सहभागी सैनिकांचा सन्मान

विवरे ता.रावेर वार्ताहर -raver

सन १९७१ मध्ये भारत- पाकिस्तान युद्धात अतिशय मोलाची कामगिरी बजावलेल्या मराठा बटालियन यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे.त्या अनुषंगाने या युद्धाचे साक्षीदार असलेल्या सैनिकांचा घरी जाऊन सत्कार करण्यात येत आहे.या युद्धात विवरा येथील भूमिपुत्र एकनाथ चौधरी देखील सहभागी होते.त्यांच्या कार्याचा गौरव विवरा येथे करण्यात आला.

- Advertisement -

येथिल रहिवासी एकनाथ काशिराम चौधरी यांनी वयाच्या अठराव्या वर्षी देश सेवा करण्याचा ध्यास पुर्ण करण्यासाठी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला.आणि खडतर प्रशिक्षणानंतर त्यांना स्थान देखील मिळाले.सुरवातीला बेडगाव कर्नाटक येथे आर्मीची ट्रेनिंग घेऊन देश रक्षणासाठी सज्ज होऊन पश्चिम बंगाल, पंजाब, मिझोरम, कश्मिर,राजस्थान, हैद्राबाद,नागपुर याठिकाणी आपली कारकिर्दी पार पाडत १९७१ भारत पाकिस्तानच्या युध्दा महत्वाची भुमीका बजावली.दि.३ डिसेंबर १९७१ ला युद्धाला सुरवात झाली ते  १८ डिसेंबर १९७१ पर्यंत सुमारे पंधरा ते १८ दिवस हे युद्ध सुरू राहीले.१५ मराठा रेजीमेंट अठारी बॉर्डर शेजारी बुर्ज गावी रावीनदी जी पाकिस्तानात जाते,त्या ठिकाणी हे भीषण युध्द सुरू होते. सहा डिसेंबर १९७१ ला पाकीस्तानवर डिफेन्स अटैक करत ४३ ( बलुच)  पाकीस्तानचे पुर्ण रेजिमेंटचा बटालियनने खात्मा करत युद्ध काबीज केले, तसेच याच बटालीयनचे सैनिक पांडूरंग साळुंखे यांना मरणोत्तर महा विर चक्र देखिल मिळाले आहे.

या कामगिरी पार्श्वभूमीवर व आर्मीच्या १५ बुर्ज मराठा बटालियनच्या ५० व्या  वर्षापुर्तीनिमीत्त या बॅच मधील  ४० माजी सैनिकांच्या घरी आर्मीचे कर्मचारी जाऊन स्मृती चिन्ह देऊन सत्कार सन्मान करत आहे.त्यात विवरा येथील एकनाथ चौधरी यांचा समावेश आहे. त्यांनी १९ वर्ष आर्मीत तर २० वर्ष पोलीस दलात कामागीर बजावली आहे.त्यांच्या या सन्मानाने चौधरी यांनी युद्धातील आठवणींना उजाळा दिला.त्यांच्या सोबत असलेल्या व युद्धात शाहिद झालेल्या जवानांची आठवण करत डोळे पणावले होते.अंगावर शहारे येतील असे अनुभव यावेळी त्यांनी कथन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या