Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमनसुख हिरेन प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल

मनसुख हिरेन प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल

मुंबई

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात दहशतवादविरोधी पथककडून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाने कालच हा तपास ठाणे शहर पोलीस यांच्याकडून काढून दहशतवाद विरोधी पथककडे वर्ग केला. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे.एटीएसचे पथक मनसुख हिरेन यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले होते. त्यावेळी मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप हिरेन यांच्या कुटुंबियांनी केला होता. आज अखेर विमला हिरेन यांच्या फिर्यादिवरुन मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता, त्याठिकाणी एटीएसच्या पथकानं भेट दिली आहे. एटीएसचे प्रमुख शिवदीप लांडे आपल्या टीमसोबत घटनास्थळी दाखल झाले होते. तिथे त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. एटीएसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसचं पथक संपूर्ण घटना समजून घेऊन क्राईम सीनही रिक्रिएट करणार आहे. तसेच एटीएसचं पथक संपूर्ण परिसरातील फोटेजही तपासत असून घरातून निघाल्यानंतर मनसुख हिरेन नेमके कुठे गेले, याचा शोध घेण्याचा एटीएसचं पथक प्रयत्न करत आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएसच्या तपासाला वेग आला असून एटीएसच्या तपासातून काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या