Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनेटवर्क सुधारण्यासाठी आयडियाला मनसेचा दोन दिवसाचा अल्टिमेटम

नेटवर्क सुधारण्यासाठी आयडियाला मनसेचा दोन दिवसाचा अल्टिमेटम

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात आयडिया मोबाईल कंपनीचे चाळीस ते पन्नास टक्के ग्राहक असून त्यांना आठ ते दहा दिवसापासून अतिशय खराब पद्धतीने नेटवर्क मिळत आहे. त्याचा सर्वात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. कारण त्यांचा ऑनलाईन चालू असलेला क्लास शाळा शाळेचा अभ्यास हा नेटवर्क गेल्यामुळे बंद पडत आहेत.

- Advertisement -

याबरोबरच इतर ऑफिसचे कामही बंद पडत आहेत. सरकारी कामे देखील बंद पडतात.आज करोनासारख्या सोशल डिस्टंसिंगच्या आजारामुळे मुळे सर्व कामे ऑनलाइन चालू असताना अशा प्रकारे जर नेटवर्क बंद पडत असेल तर नागरिकांना व आयडिया लाभ घेताना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो लागत आहे.

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयडिया कंपनीचे विशाल कडवे नेटवर्क मध्ये सुधारणा करण्यासाठी दोन दिवसाची मुदत देऊन नेटवर्क सुधारण्याची विनंती केली. दोन दिवसात नेटवक सुधारले नाही तर आम्ही पुन्हा तुमच्या कार्यालयात येऊ व त्याची होणारी सर्वस्व जबाबदारी ही आपली असेल, असा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसेचेचे जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, मनविसेचे जिल्हाध्यक्ष सौरभ सोनवणे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख, शारीरिक सेनेचे विजय आगळे, अमोल भालेरावआदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या