Wednesday, April 24, 2024
Homeनगरमानोरी केटीवेअर बंधार्‍याला गळती

मानोरी केटीवेअर बंधार्‍याला गळती

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात शेतकर्‍यांना वरदान ठरलेल्या मानोरी के.टी.वेअर बंधार्‍याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.

- Advertisement -

ही गळती पाटबंधारे विभागाने त्वरित लक्ष घालून थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने 26 दशलक्ष घनफूट क्षमता असलेले मुळा धरण 100 टक्के भरले असून मुळा नदीपात्रात कोल्हापुरी पद्धतीचा मानोरी केटीवेअर बंधारे, डिग्रस, मांजरी, वांजुळपोई या बंधार्‍याचा फायदा राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तांदुळवाडी, कोंढवड, आरडगाव, शिलेगाव, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, मानोरी, वळण, चंडकापूर, मांजरी या गावातील लाभधारक शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात होत असतो.

मानोरी बंधार्‍यावरील फळ्या नादुरुस्त असल्याने पाणी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे बंधार्‍यांची पाण्याची पातळी खालावली असून पाटबंधारे विभागाने त्वरित नादुरुस्त असलेल्या फळ्या दुरुस्त करून त्याची गळती थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या