Wednesday, April 24, 2024
Homeनगरमानोरी परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

मानोरी परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या राहत्या घरातून पळवून नेल्याची घटना दि. 14 जून रोजी राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात घडली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात विशाल भोसले याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अपहरण करण्यात आलेली ती 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात तिच्या आई वडिलांसोबत राहते. दि. 14 जून रोजी रात्री साडेनऊ ते 15 जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान आरोपीने त्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखविले आणि तिला तिच्या आईवडिलांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. हा प्रकार सकाळी उठल्यानंतर तिच्या आई वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी त्या मुलीचा परिसरात खूप शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही.

त्या मुलीच्या वडिलांनी अखेर राहुरी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद नोंदविली. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विशाल चंद्रकांत भोसले वय 24 वर्ष, रा. खंडेश्वरी नगर, तालुका, जिल्हा बीड याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 505/2022 भादंवि. कलम 363, 366 प्रमाणे अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या