Friday, April 26, 2024
HomeमनोरंजनThe Family Man Season 2 : 'द फॅमिली मॅन २' चा धमाकेदार...

The Family Man Season 2 : ‘द फॅमिली मॅन २’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ तारखेला येणार भेटीला

मुंबई | Mumbai

अभिनेता मनोज बाजपेयीची वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’ २०१९ मध्ये रिलीज झाली होती. या वेब सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्यानंतर मागच्या बऱ्याच काळापासून या वेब सीरिज्याच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक मागच्या बऱ्याच काळापासून प्रतिक्षा करत होते.

- Advertisement -

आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा सीझन खरं तर फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार होता पण या वेब सीरिजची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता येत्या ४ जूनला ही सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, या वेब सिरीजमध्ये अभिनेता मनोज बाजपेयी यांनी टी.ए.एस.सी. या गुप्तहेर संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक श्रीकांत तिवारी यांची भूमिका साकारली आहे. या सीझनमध्‍ये श्रीकांत नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्‍पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सीरिजच्‍या ९ भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्‍तचर अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच देशाचे घातक हल्‍ल्‍यापासून संरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न करताना पाहायला मिळणार आहे.

या सिरीजमधून दक्षिणेची सुपरस्‍टार सामंथा अक्किनेनीचे डिजिटल पदार्पण होत आहे. या सिरीजमध्‍ये मनोज वाजपेयीसोबत, प्रियामणी, यांच्यासोबत शरिब हाश्‍मी, सीमा बिस्‍वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्‍वंतरी, शाहब अली, वेदांत सिन्‍हा आणि महक ठाकूर यांसारखे प्रतिभावान कलाकार आहेत. या सोबतच तमिळ चित्रपटसृष्‍टीमधील नावाजलेले मिमे गोपी, रविंद्र विजय, देवदर्शिनी चेतन, आनंद सामी आणि एन. अलगमपेरूमल देखील असणार आहेत.

अलीकडेच अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ या वेब सीरीजनं देशातील राजकीय वातावरण ढवळून काढलं होतं. त्याच दरम्यान या वेब सीरीजच्या प्रसिद्धीची तारीख जवळ आली होती. पण तांडव वेब सीरीजमुळे निर्माण झालेल्या वादाचा फटका ‘द फॅमिली मॅन’ च्या दुसऱ्या सीझनला बसण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे या वेब सीरीजच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर टाकण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या