Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : 'मौनमोहन' म्हणणाऱ्या भाजपवर मनमोहन सिंग कडाडले

Video : ‘मौनमोहन’ म्हणणाऱ्या भाजपवर मनमोहन सिंग कडाडले

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

कमकुवत पंतप्रधान, भ्रष्टाचारी, मौनमोहन असे खोटे आरोप करणाऱ्या भाजप (BJP) आणि त्यांच्या ब आणि क चमूंच्या दुष्प्रचारांचे पितळ आता लोकांसमोर उघडे झाले आहे…

- Advertisement -

२००४ ते २०१४ या काळातील काँग्रेसप्रणित सरकारच्या (Government) लोकोपयोगी कामांची आठवण आता लोक काढू लागले आहेत. मी १० वर्षे पंतप्रधानपद भूषवले आहे. मी बोलण्यापेक्षा काम करण्याला अधिक प्राधान्य दिले असल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी केली आहे.

पंजाबमधील (Punjab) ११७ जागांसाठी रविवारी मतदान (Voting) होत आहे. या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी पंजाबी भाषेत ९ मिनिटांची चित्रफीत प्रसिद्ध केली आहे. याद्वारे मतदारांना मनमोहन सिंग यांनी अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे.

मणिपूर (Manipur) आणि उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जनतेलादेखील काँग्रेसला (Congress) मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलेले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलताना मनमोहन सिंग यांनी आपल्याला मौन मोहन म्हटले जात होते, मात्र लोकांना आता आपण केलेली चांगली कामंच आठवतात अशा शब्दांत त्यांनी भाजपाला सुनावले आहे.

Visual Story : केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाबाबत सुनील शेट्टी म्हणतात…

ते पुढे म्हणाले की, देशातील परिस्थिती गंभीर असून करोनाच्या (Corona) काळातील केंद्राच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे अर्थव्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत, गरीब आणखी गरीब होत आहेत. साडेसात वर्षे सरकार चालवल्यानंतरदेखील स्वत:च्या चुकांचे खापर पंडित जवाहरलाल नेहरूंवर (pandit jawaharlal nehru) टाकले जात आहे.

मनमोहन सिंग मोदींना म्हणाले की, पंतप्रधान पदाला प्रतिष्ठा असते आणि इतिहासाला दोषी ठरवून तुमचे गुन्हे कमी होत नाहीत. जगासमोर पंतप्रधान म्हणून मी कधीही देशाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू दिला नाही’, असे सिंग म्हणाले.

होऊ द्या खर्च! आता बस उडणार हवेत; गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट

गेल्या महिन्यात सुरक्षेचे कारण देत मोदी पंजाबचा दौरा पूर्ण न करताच दिल्लीला परतले. याबाबत बोलताना सिंग म्हणाले की, पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी आणि पंजाबमधील जनतेला बदनाम केले गेले. शेतकरी आंदोलनादरम्यान ‘पंजाबियत’चाही अपमान केला,” अशी टीका सिंग यांनी केली.

लडाखमध्ये (Ladakh) प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनची घुसखोरी दडपण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा आरोपही सिंग यांनी केला. नेत्यांना बळजबरीने मिठी मारून, झुल्यांवर झुलवून वा बिर्याणी खाऊन परराष्ट्र संबंध सुधारत नाहीत, ही बाब आता पंतप्रधान मोदींना आता समजले असेल असाही टोला त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या