Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांची बदली

मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांची बदली

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांची तडकाफडकी सिन्नरला बदली करण्यात आली असून त्यांनी सिन्नरला जाऊन सूत्रे हाती घेतली आहे.

- Advertisement -

एकीकडे शहरात करोनाचा उद्रेक सुरू असताना दुसरीकडे मुख्याधिकाऱ्याची अचानक बदली करण्यात आली शिवाय त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली नाही त्यामुळे नागरिका मध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

शहरात रोज करोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने अगोदरच नागरिका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतांना आता पालिकेत मुख्यधिकारीच नसल्याने नियोजन आणि उपाययोजना करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरावर करोनाचे संकट वाढलेले असतांना अशा वेळी मुख्यधिकाऱ्याची बदली करून एका प्रकारे शासनाने मनमाडला वाऱ्यावर सोडल्याचे मत नागरिकांनी व्यक्त करून येथे तातडीने नव्या मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या