Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामांजरपाडा प्रकल्प पूर्णत्वाकडे; लवकरच अस्तरीकरणाचे काम सुरु होणार

मांजरपाडा प्रकल्प पूर्णत्वाकडे; लवकरच अस्तरीकरणाचे काम सुरु होणार

येवला | प्रतिनिधी Yeola

मांजरपाडा प्रकल्प पूर्णत्वाकडे असून लवकरच पुणेगाव ते दरसवाडी पोहोच कालव्याचे अस्तरीकरण काम सुरू होईल, असे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने केले.

- Advertisement -

छगन भुजबळांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे प्रथमच मतदार संघात आगमन झाले. मिरवणूक संपल्यानंतर संपर्क कार्यालयाचे आवारात झालेल्या सभेत भुजबळ बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नाशिकपासून प्रत्येक गावात ठीक ठिकाणी प्रचंड गर्दी जमली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच भाजप, सेना, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांनी स्वागत केले. आजच्या मिरवणुकीने मी भारावलो आहे. माझ्या आयुष्यात एवढी मोठी मिरवणूक पहिल्यांदाच मी पाहतो आहे. ३४ – ३५ वर्षात अनेक पदे आली, मात्र मंत्रिपदाच मला अप्रूप नाही, पण ते महाराष्ट्राची सेवा करण्याचे एक साधन आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

कोविड मध्ये स्वस्त धान्य दुकाने सुरू ठेवली. अनेक विकास कामे केली. शिवसेने पासून माझे राजकारण सुरू झाले. छगन भुजबाळला कुणी गॉड फादर नव्हता. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत २००४ मध्ये मी प्रथम येथे आलो. अनेक ठिकाणाहून उमेदवारी साठी बोलावणे येत होते, पवार साहेबांनी जुन्नर मधून उमेदवारी करण्यास सांगितले. मात्र येथील रस्ते, पाऊस, पाणी सर्व बाबतीत येवला मतदार संघ मागास होता, येथील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मीच येवल्याची निवड केली. पवार साहेबांनी सांगितले की, चूक केली. मात्र साहेब आशा चुका राज्यभर करा असेही भुजबळ म्हणाले. मंत्री भुजबळ यांनी भावुक होत गत ३४ – ३५ वर्षाचा इतिहास व चढ – उतार सांगितला आणि येवलेकरांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या