Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकमांजरगाव गाव विकास संघाने केला विकासाचा संकल्प

मांजरगाव गाव विकास संघाने केला विकासाचा संकल्प

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील तरूण पिढी व गाव विकास संघाच्या माध्यमातून गावामध्ये विविध प्रकारचे समाज मंदिरे बांधण्यात आली आहेत.

- Advertisement -

मात्र, मंदिराबरोबरच शाळा एक सुंदर मंदिर असल्याने तिथे सर्व जाती-धर्माची मुले शिकतात.म्हणून त्या मंदिराचा प्रथम विकास करण्याचा संकल्प कर्तव्यदक्ष सरपंच पंडित आनंदा सोनवणे यांच्या नेतृत्वात गाव विकास संघाने घेतला आहे.

गावच्या विकासासाठी गावातील अनेक प्रश्न त्यांनी सोडविले आहे. आता रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, अन्न, निवारा ह्या समस्या सोडविण्यात यशस्वी होत आहे. गावातील शिक्षक बाळासाहेब सोनवणे व शिक्षक संजय रघुनाथ सोनवणे, भास्कर सोनवणे, छबु हाडपे, पत्रकार गणपत हाडपे, नवनाथ नथू सोनवणे, इंजि.सुरेश बोडके, सुभाष गंगाधर सोनवणे, उत्तम सानप, सोमनाथ अध्यक्ष सोनवणे, पोपट सानप ह्या समाजसेवकांच्या मदतीने सुंदर गाव संकल्पना साकारणार आहेत.

गाव विकासासाठी आर्थिक निधी जमवण्यासाठी प्रयत्न चालू आहे.गावातील तरूण सुशिक्षीत हुन्नर पिढी व कामानिमित्त असलेले सर्व बाहेरच्या शहरात स्थायिक असलेले ग्रामस्थ व गावातील ज्येष्ठ आणि अनुभवी,ग्रामस्थ यांच्या सहकारातून गावचे स्वप्न साकार होणार आहे.आयुर्वेदीक झाडांची संकल्पना साकार करून गावातील बरेच आजार त्या माध्यमातून पुर्ण बरे होण्यासाठी मदत होणार आहे.

हरीत ग्राम योजना व शासनाच्या अनेक योजनामधून सर्व प्रश्न सोडविले जाणार आहे.तसेच ज्येष्ठ लोकांच्या समस्या व मदत हे काम गाव विकास संघातून सोडविले जाणार आहे.एक आनंदी व स्वच्छता असलेले हरीत गाव म्हणून गावची नव्याने ओळख दिसणार आहे.शाळेतील सर्व मुलांना अभ्यासासाठी टॅब दिले जाणार आहेत.

डिजिटल वर्ग करून दिले जाणार आहेत. गावात वाचनालय सुरू करून हुशार व गरजू मुलाना अभ्यासासाठी वातावरण निर्मिती केली जाणार आहे. त्यात संस्कार, संस्कृती, राष्ट्रीय मुल्ये व गावाबद्द्ल असलेले प्रेम, आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गावातील वाईट धंद्याना मुठमाती देऊन व प्रतिबंध करून गावातील नवीन पिढीला व्यसनापासून वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाणार आहे.गावात अध्यात्मिक वातावरण तयार करून वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण करणार आहोत.

यात माणिक सोनवणे, ॲड. चिंतामण हाडपे, सिताराम सोनवणे, संदीप सानप, साहेबराव सोनवणे, सुनीलशेठ सोनवणे, खंडू नामदेव सानप, सोमनाथ नागरे, छबू उगले, भाऊराव सानप, रामदास उगले, डॉ. संजय हाडपे, शरद हाडपे, डॉ. दगू हाडपे, श्रीकृष्ण सोनवणे, संपत सानप, बबन सोनवणे, सुनील मारूती सानप, अजित बोडके, दशरथ हाडपे, विलास तुकाराम सोनवणे, अजित सोनवणे,प्रा. गजानन हाडपे, चिंतामण सोनवणे.

विक्रम नागरे, अरुण साळवे, दिलीप सोनवणे फोटोग्राफर, गोविंद सोनवणे, प्रकाश साळवे,विनायक बोंद्रे, सचिन रामनाथ सोनवणे, कारभारी दौंड, किशोर हाडपे, सागर सोनवणे, बापू दौंड, ज्ञानेश्वर हाडपे, रविंद्र सोनवणे, संतोष सोनवणे, भाऊराव दौंड, गणेश सोनवणे, रामनाथ सानप, कैलास नामदेव सोनवणे, संदीप सोनवणे, योगेश सानप, निखिल सानप, अमोल हाडपे, प्रकाश हाडपे, रामदास सोनवणे, बाबाजी सोनवणे.

दिनेश बोडके, बाळासाहेब नागरे, किशोर वाईकर, राहुल नागरे, सचिन सानप, ज्ञानेश्वर सोनवणे, बबन सोनवणे, नवनाथ बिडवे, राहुल बिडवे, अक्षय राऊत, योगेश राऊत, चंद्रभान गांगुर्डे, रावसाहेब उगले, शरद गांगुर्डे,लक्ष्मण गांगुर्डे, बाळू आंबेकर, लहानु आंबेकर,सजन आंबेकर, शिवाजी गायकवाड, निलेश गांगुर्डे, वाळीबा गांगुर्डे, सोमा गांगुर्डे, सोनू जाधव आदी सर्व काम पाहतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या