Friday, April 26, 2024
Homeनगरब्राम्हणगाव वेताळ सरपंचपदी मनीषा शिंदे

ब्राम्हणगाव वेताळ सरपंचपदी मनीषा शिंदे

शिरसगाव (वार्ताहर) –

श्रीरामपूर तालुक्यातील ब्राम्हणगाव वेताळ ग्रामपंचायत सरपंचदी सौ. मनीषा समाधान शिंदे व उपसरपंचपदी सौ. अरुणा कैलास पानसरे यांची

- Advertisement -

बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही ससाणे गटाच्या महिला असल्याने ब्राम्हणगाव येथे आता नव्याने महिला राज सुरु झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत ससाणे गटाचे 5 सदस्य व माजी आ. भानुदास मुरकुटे गटाचे 2 सदस्य निवडून आले होते. चारवेळा पुन्हा ससाणे गटाची ग्रामपंचायत मध्ये सत्ता आली आहे.

निवडणूक प्रक्रियेत सरपंच पदासाठी मनीषा शिंदे नावाची सूचना छाया संजय मोरे यांनी मांडली. उपसरपंच सौ अरुणा पानसरे यांच्या नावाची सूचना वर्षा म्हस्के यांनी मांडली. निवडणूक अधिकारी अध्यासी सी. ए. देशमुख यांनी काम पहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे, कामगार तलाठी जे. पाखरे, नामदेव वाणी, पोलीस पाटील संदीप वेताळ यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या