Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशManipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळीबारात ९ जणांचा मृत्यू

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळीबारात ९ जणांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारात नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. तर दहा जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

अज्ञात हल्लेखोरांनी चर्चमध्ये गोळीबार केला आहे. या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना सध्या इंफाळ येथील राज मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत कुकी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Video : तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री ED च्या कचाट्यात, बेड्या पडताच ढसाढसा रडले… नेमकं प्रकरण काय?

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण ११५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चाळीस हजारांपेक्षा अधिक लोक विस्थापीत झाले आहेत. मणिपूरमधील मैतई आणि कुकी समुदायामध्ये गेल्या मे महिन्यात वाद झाला होता, तेव्हापासून या हिसांचाराला सुरुवात झाली आहे.

Mumbai-Pune Expressway वरील खंडाळा घाटात केमिकल टँकरचा भडका; तिघांचा होरपळून मृत्यू; वाहतूक ठप्प

- Advertisment -

ताज्या बातम्या