Sunday, April 28, 2024
Homeनगरमाणिकदौंडीतील बलखंडीबाबा मंदिरात चोरी

माणिकदौंडीतील बलखंडीबाबा मंदिरात चोरी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील माणिकदौंडी (Manikdaundi) परिसरातील जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या बलखंडीबाबा मंदीरात चोरी (Temple Theft) झाली असून यात पाच किलो वजनाचा चांदीचा घोडा चोरट्यांनी (Silver Horse Theft) चोरुन नेला आहे. मंदीराचे पुजारी रमु बाबु पठाण यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

मुंगीच्या सरपंचावर एकाचा कोयत्याने जीवघेणा हल्ला

पोलिस अधिकार्‍यांनी श्वानपथक (Police Dog Team) व ठसे तज्ञांना बोलविले होते. चोरटयांनी वाहनाचा वापर केल्याने श्वानाने तेथेच मार्ग दाखविला. माणिकदौंडी (Manikdaundi) गाव व परीसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणा-या बलखंडीबाबा मंदीरातील पुजारी रमु पठाण हे आज सकाळी सहा वाजता मंदीरात (Temple) स्वच्छतेसाठी गेले. त्यावेळी त्यांना गेटचे कुलुप तुटलेले व गेट उघडे असलेले दिसले. रमु पठाण यांनी आलमगीर पठाण, पोपट पठाण व पोलिस पाटील वंसत वाघमारे यांना बोलावुन घेतले. त्यावेळी पाहीले असता मंदीरातील कपाटातील पाच किलो वजनाचा व सुमारे पन्नास वर्षापुर्वीचा असलेला चांदीचा घोडा चोरट्यांनी चोरुन (Silver Horse Theft) नेला असल्याचे उघड झाले.

ओबीसी आरक्षणाचा निर्णय आनंददायी

माहीती मिळताच पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंडे, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, निलेश म्हस्के, अतुल शेळके यांनी बलखंडीबाबा मंदीराला भेट दिली. श्वानपथक व ठसे तज्ञांना बोलविले होते. त्यांनी पंचनामा करून व पाहणी केली. श्वानाने घटनास्थळाजवळच माग दाखविला मात्र चोरट्यांनी वाहनाचा वापर केल्याने पुढील माग सापडला नाही.

इलेक्ट्रिक कंपनीच्या व्यवस्थापक व लिपिकास लाच घेतांना रंगेहात पकडलेबनावट सातबारे बनवून आयडीबीआय बँकेला 26 लाखांचा गंडा

बलखंडीबाबा हे आपले सर्वांचे श्रद्धास्थान आहे. चोरीचा तपास लागला पाहीजे. माणिकदौंडी गावातील तलाठी कार्यालसमोरील झाडाच्या लोखंडी संरक्षक जाळ्या, गावातील दुकानासमोरील विजेचे दिवे अशा अनेक प्रकारच्या चोर्‍या गेल्या महीनाभरात झाल्या आहेत. चोर पकडले जावेत ही ग्रामस्थांची इच्छा व मागणी आहे.

– समीर पठाण (उपसरपंच माणिकदौंडी.)

पाथर्डी नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीमनगर शहर शिवसेनेची लवकर फुटीच्या दिशेने वाटचाल ?

- Advertisment -

ताज्या बातम्या