Friday, April 26, 2024
Homeनगरबंदी असलेले साडेचार लाखाचे मांगूर मासे पकडले

बंदी असलेले साडेचार लाखाचे मांगूर मासे पकडले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बंदी (Ban) असलेल्या मंगूर मासे (Mangoor Fish) घेऊन जाणारा टेम्पो (Tempo) व मांगूर मासे (Mangoor Fish) असा साडे बारा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त (Seized) केला. श्रीरामपूर शहर पोलिसांच्या (Shrirampur Police Action) पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात (Police Station) आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे. यातील सर्व आरोपी परप्रांतीय आहेत.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत कांदा व सोयाबीनला मिळतोय हा भाव

श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन (Shrirampur City Police Station) हद्दीतुन प्रतिबंधीत असलेल्या मांगूर माशाची (Mangoor Fish) चोरटी वाहतुक होत असल्याची खबर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस उपनिरिक्षक समाधान सुरवाडे व पोलीस स्टाफ यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने बेलापूर ते नेवासा रोडवरून जाणार्‍या टाटा आशर ट्रक (क्र. एम.एच 46 बी.यु 7866) हा मांगूर मासे घेऊन जाताना मिळुन आला. या ट्रकमध्ये 4,50,000 रुपये किंमतीचे अंदाजे तीन टन वजनाचे व अंदाजे 150 रुपये प्रती किलो वजनाचे मांगुर प्रजातीचे मासे (Mangoor Fish) आढळून आले. पोलिसांनी 8,00,000 रुपये किंमतीचा टाटा आयशर कंपनीचा मालवाहतुकीचा ट्रक व मांगूर मासे (Mangoor Fish) असा साडेबारा लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

जिल्ह्यात हुडहुडी !

याप्रकरणी प्रतिबंधीत मासे यांचे संवर्धन करून त्यांची वाहतूक करुन घेवुन जाणार्‍या असादुल मंडल मुफुजर रेहमान मंडल (रा. उचलन, पुर्व बढवण, वेस्ट बंगाल), अर्षद बाबुराली गाझी (वय 43, बैस्नाब तला, स्वरुपनगर, बिचारी, नॉर्थ 24 पगीनास वेस्ट बंगल), मनोज रामधन यादव (वय 27, हल्ली रा. रामधन यादव, दत्त मंदिर चाळ, रोड नं. 22, साठेनगर वागळे ईस्टेट, ठाणे, मुळ रा.मझाँवों ता. बेल्लथारोड जि. बलिया), विवेकानंद आत्मज उमाशंकर (वय 28, रा. ग्राम पचवनिया, पो. पचवनिया चकिया, चंदौली, उत्तर प्रदेश), सुनिल बारकु यादव (रा. चेरुइडीह, बंदु कलामऊ, उत्तर प्रदेश), प्रदिपकुमार कंन्कराज मोरी (वय 30, हल्ली रा. गळनींब, सुरेगाव, प्रवरासंगम, ता. नेवासा, मुळ रा. कैकलोरु, जि. येलुर, आंध्रप्रदेश), मुक्कमल विश्वास (वाहन मालक) व मोहनेश्वर गणगे (जागा मालक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोषण आहार अनुदान रक्कम, अन्न शिजविण्याच्या दरात वाढ

आरोपींनी संगमताने केंद्रीय कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी दि.19 डिसेंबर 1997 च्या परिपत्रकामध्ये मांगुर (Clarius Gariepinus) माश्यापासून भारतीय माश्यांना प्रजातीला व पर्यावरणाला धोका निर्माण झाला असल्याने सदर मस्यपालन करुन त्यांची विक्री व वाहतुकीस घातलेल्या बंदी आदेशाचा जाणीवपूर्वक भंग करून सदर प्रतिबंधित माशांचे संवर्धन करुन विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करताना मिळुन आल्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल श्री. क्षिरसागर यांनी दिली. फिर्यादीवरुन त्यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा र. नं. 1067/ 2022 भा.दं.वि. कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मासे सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी श्रीमती पी. एस. पाटेकर (अहमदनगर) यांचे मार्फतीने नष्ट करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पालीस नाईक श्री. वांढेकर करीत आहेत.

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘चाणक्य विष्णूगुप्त’

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहायक पोलीस निरिक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरिक्षक जिवन बोरसे, पोलीस उपनिरिक्षक समाधान सुरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लाला पटेल, पोलीस नाईक कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल क्षिरसागर, पोलीस कॉन्स्टेबल गुंजाळ डी.,पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल लगड, पोलीस कॉन्स्टेबल कालखडे, पोलीस कॉन्स्टेबल अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर, चालक पपोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव-परळी रेल्वे
मार्गासाठी पुढाकार घेण्याची मागणी

- Advertisment -

ताज्या बातम्या