Thursday, April 25, 2024
Homeनगरब्रिटिशांनी लावलेली आंब्याची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर

ब्रिटिशांनी लावलेली आंब्याची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी खरात वस्ती परिसरात आंब्याचे झाड उन्मळून पडले. ब्रिटिशांनी लावलेली हि झाडे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

- Advertisement -

ब्रिटिशांनी दारणा व गंगापूर धरणाची निर्मिती करून या भागाला 1910 साली गोदावरी उजव्या व डाव्या कालव्या द्वारे पाणी आणले. शंभर किलोमीटर अंतरावर ब्रिटिशांनी गोदावरी कालव्यांच्या कडेला चिंच, आंबा, लिंब, जांभूळ आदी फळझाडे लावली. मात्र आवर्तानात कपात झाल्यान कालवे दीड महिनाही उशीराने वाहतात. त्यामुळे शेतीबरोबरच झाडावर ही आस्मानी संकट उभे राहिले आहे.

हीच आंब्याची व आदी फळांची झाडे उन्मळून जमिनीवर पडण्याचे चित्र पाहावयास मिळते. सोनेवाडी परिसरात धर्मा खरात त्यांच्या वस्तीजवळ असेच एक झाड रात्री उन्मळून पडले. झाड पडल्याच्या आवाजाने वस्तीवरील नागरिक झोपेतून जागे झाले. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना झाड पडले याची माहिती दिली. अधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. ही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पाटबंधारे विभागाने वैज्ञानिक पद्धतीने ही झाडे आणखीन काही दिवस तग धरून राहतील यासाठी प्रयत्न करायला हवे अशी मागणी सोनेवाडी परिसरातील वृक्ष प्रेमींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या