Saturday, May 11, 2024
Homeनाशिकनाशकात लवकरच आंबा महोत्सव; अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला करता येणार खरेदी

नाशकात लवकरच आंबा महोत्सव; अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला करता येणार खरेदी

नाशिक | Nashik

कोकण पर्यटन विकास संस्थेतर्फे (konkan tourism development corporation) येत्या गुरुवार (28 एप्रिल) पासून सीबीएस येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात (District bank hall near cbs) आंबा महोत्सवाला (Mango Festival) प्रारंभ होणार आहे.

- Advertisement -

या महोत्सवाचे उद्घाटन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे हस्ते आणि जिल्हा बँंकेचे कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

याबाबतची माहिती माहीती कोकण पर्यटनचे संचालक दत्ता भालेराव यांनी दिली. अक्षय तृतीयेच्या तोंडावर हा महोत्सव होणार आहे.

नाशिककर खवय्यांसाठी यंदाही कोकणमेवा उपलब्ध होणार आहे. हापुस आंब्याची गोडी चाखण्यासाठी कोकण पर्यटन विकास संस्थेच्यावतीने आंबा महोत्सवाचे आयोजन 14 वर्षापासुन करत आहे.

सकाळी अकरा ते रात्री आठपर्यंंत हा महोत्सव खुला राहील. यात 36 शेतकरी सहभागी होणार आहेत. रत्नागिरी, केळसी, पावस, गुहागर, दापेाली, लांंजा, राजापुर, मांजरे, संगमनेरे या गावांतून शेतकरी महोत्सवात सहभागी होत आहेत.

आंब्या बरोबरच करवंद, जांभुळ, आवळा, यापासुन बनवीलेला केाकण मेवाही उपलब्ध राहील. महोत्सवाला दरवर्षी मिळणारा प्रतिसाद पाहता यंदाही महोत्सव चांगला होईल.असे भालेराव यांनी सांंगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या