Friday, April 26, 2024
Homeजळगावमंदिर अध्यात्मासह समाजाच्या जागृतीचे केंद्र-आ.मंगेश चव्हाण

मंदिर अध्यात्मासह समाजाच्या जागृतीचे केंद्र-आ.मंगेश चव्हाण

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

संत सेवालाल महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे ङ्गजानजो छानजो पच मानजो म्हणजे कुठलीही गोष्ट आधी जाणून घ्या. बुद्धीच्या कसोटीवर तपासून घ्या आणि स्वीकारार्ह वाटली तरच स्वीकारा हे विचार आता समाजाने अंगिकारले पाहिजेत.

- Advertisement -

त्यामुळे त्यांचे उभारण्यात येत असलेले मंदिर हे केवळ अध्यात्माचे नव्हे तर समाजाच्या जागृतीचे केंद्र म्हणून पुढे यायला हवे असे प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले. तालुक्यातील वाघले येथे संत सेवालाल महाराज मंदिराचे भूमिपूजन आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पोपट तात्या भोळे, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, भाजपा सरचिटणीस अमोल चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार यांच्यासह सरपंच आनंदा चव्हाण, ताराचंद राठोड, जगन चव्हाण, संजीव पाटील, ताथीलाल पवार, उखा राठोड, पुंडलिक राठोड, मा.सरपंच सुभाष राठोड, साहेबराव दादा, रामदास राठोड, सुधाकर राठोड, प्रेमचंद राठोड, दिपक पाटील, मालपुरे सर गावातील पदाधिकारी आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना आमदार श्री.चव्हाण म्हणाले की, महापुरुष हे कोणत्याही एका जातीचे धर्माचे नसतात तर ते राष्ट्राचे दिशादर्शक असतात. संत सेवालाल महाराज हे केवळ गोर बंजारा समाजाचे, महाराष्ट्राचे नव्हे तर समस्त भारताचे संत आहेत. त्यांनी दिलेली शिकवणुक सर्वाना प्रेरणादायी अशी आहे. तसेच आमदार निधीतून संत सेवालाल महाराज यांचे मंदिर बांधकामासाठी ५ लक्ष रुपये देणार असल्याचे आश्वासन देखील आमदार चव्हाण यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या