Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकवसंत करंडक राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत मिथुन माने प्रथम

वसंत करंडक राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत मिथुन माने प्रथम

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

क्रांतिवीर वसंतराव नाईक यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याचा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वसंत करंडक ही राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित केली जात आहे. या वकृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती या चळवळीच्या माध्यमातून निर्माण करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी केले.

- Advertisement -

क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित वसंत करंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अँड. पी. आर. गिते, विश्वस्त दामोदर मानकर , संचालक विष्णुपंत नागरे , संचालिका शोभा बोडके, शिक्षणाधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत वाघ ,उपप्राचार्य डॉ.पौर्णिमा बोडके ,परिवहन अधिकारी वासुदेव भगत, पांडुरंग बोडके आदी उपस्थित होते.

आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना ज्येष्ठ संपादक डॉ. राहुल रनाळकर म्हणाले की, क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक यांचे कार्य आजच्या तरुण पिढीला आदर्शवत ठरेल असे आहे. त्यांच्या नावाने होणारी राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासात महत्त्वाचे ठरत आहे.

आजच्या तरुण पिढीकडे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे वाचन संस्कृतीकडे दुर्लक्ष झाल्याने जर आपल्याला स्पर्धेत टिकायचे असेल विचार मंथन, व्यक्तिमत्व विकास व संभाषण कौशल्य, विकसित करण्यासाठी वकृत्व स्पर्धा हे खऱ्या अर्थाने नेतृत्व निर्माण करण्याची पायरी आहे.

संस्थेचे विश्वस्त दामोदर मानकर यांनी आपल्या मनोगत असे म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये वकृत्व स्पर्धा कशी असावी स्पर्धा ही वैचारिक असावी त्यातून संघर्ष निर्माण होऊ नये विचारमंथन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत वाघ यांनी केले.

या स्पर्धेचा उद्देश संयोजिका डॉ.नंदादेवी बोरसे यांनी विशद केले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयातून 53 विद्यार्थी सहभागी झाले होते.

या उद्घाटन सोहळ्यास संस्थे चे उपाध्यक्ष अँड. पी. आर. गिते, विश्वस्त दामोदर मानकर ,विश्वस्त अँड. अशोकराव आव्हाड, ज्येष्ठ विश्वस्त दिगंबर गीते, संचालक विलासराव आव्हाड, विष्णुपंत नागरे ,संचालिका शोभाताई बोडके, प्राचार्य डॉ. वसंत वाघ उपप्राचार्य पौर्णिमा बोडके, शिक्षणाधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, साहित्यिक शंकरराव बोराडे ,पांडुरंग बोडके, वासुदेव भगत आदी मान्यवर उपस्थित होते. या वक्तृत्व स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रा. डॉ. न्यानोबा ढगे आणि आणि डॉ. संभाजी शिंदे हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संध्या सोनकांबळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका शैला सानप यांनी केले.

प्रथम पारितोषिक मिथुन माने यास

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक कोरेगाव महाविद्यालय येथील मिथुन दत्तात्रय माने यास वसंत करंडक व रुपये 7001 रोख देण्यात आला. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस बी के बिर्ला कॉलेज कल्याण चा विद्यार्थी कुमार यश रवींद्र पाटील यास रुपये 5001 रोख व प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस विद्यावर्धिनी सभेचे महाविद्यालय धुळे विद्यार्थी जगताप प्रसाद देविदास यास रुपये 3001 रोख व प्रमाणपत्र देण्यात आले.

तर उत्तेजनार्थ पारितोषिक शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली येथील हर्षवर्धन चंद्रकांत आलासे यास देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या