मांडओहोळ धरण ओव्हरफ्लो

jalgaon-digital
1 Min Read

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्याच्या उत्तर भागाची जीवनदायी असलेले मांडओहोळ मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने मांडओहोळ धरण गुरुवारी (दि. 20) सकाळी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. सलग दुसर्‍या वर्षी मांडओहोळ धरण भरल्याने शेतकरी वर्गासह पारनेर वासियामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रासह संपूर्ण पारनेर तालुक्याची तहान भागविणार असल्याचे शाखा अभियंता भाऊसाहेब घनदाट यांनी सांगितले. मांडओहोळ मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट आहे.

यावर्षी पळसपूर, नांदूर पठार, सावरगाव परिसरासह लाभक्षेत्रात चांगल्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे धरणात गुरुवारी 399 पैकी 380 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

नगर व पुणे जिल्ह्यातील गावांना वरदान ठरणारे या धरणातून टाकळी ढोकेश्वरसह कर्जुले हर्या, वासुंदे, कातळवेढा व पठारावरील सोळा गावांची कान्हुर पठार पाणी योजना मांडओहोळ धरणातून होत आहे. या गावांसह तालुक्यातील जवळपास 75 टक्के गावांना याच मांडओहोळ प्रकल्पातून टँकरने पाणीपुरवठा होत असतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *