Friday, April 26, 2024
Homeनाशिकमामको बँक निवडणूक : बिनविरोध निवडीची परंपरा कायम

मामको बँक निवडणूक : बिनविरोध निवडीची परंपरा कायम

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

तालुक्याची अर्थवाहिनी ठरलेल्या येथील मालेगाव मर्चंटस को-ऑप बँकेच्या (MAMCO Bank) चेअरमनपदी गौतम रमेशचंद्र शहा (Gautam Shah) तर व्हा. चेअरमनपदी भास्कर चिला पाटील (Bhaskar Patil) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गत अनेक दशकांपासून पदाधिकारी बिनविरोध निवडीची परंपरा संचालक मंडळाने यंदा देखील कायम ठेवली आहे…

- Advertisement -

मामको बँक चेअरमन राजेंद्र भोसले व्हा. चेअरमन गौतम शाह यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. रिक्त झालेल्या या पदांच्या निवडीसाठी आज मामको सभागृहात उपनिबंधक सचिन घोडके यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

आंघोळ करताना शेततळ्यात बुडाला; अथक प्रयत्नानंतर सापडला मृतदेह

सकाळी 11 वाजता निवड प्रक्रियेस उपनिबंधक घोडके यांनी प्रारंभ केला. यावेळी चेअरमन पदासाठी गौतम शहा यांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. त्यांना सूचक म्हणून शरद पाटील तर अनुमोदक म्हणून रवींद्र ओस्तवाल यांनी स्वाक्षरी केली.

तसेच व्हॉ. चेअरमन पदाकरिता भास्कर पाटील यांनी नामांकन अर्ज दाखल केले. त्यांना सूचक म्हणून छगन बागुल व अनुमोदक म्हणून अजयकांत मंडावेवाला यांनी स्वाक्षरी केली होती.

नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदतीत शाह व पाटील यांचेच अर्ज दाखल झाल्याने त्याची छाननी उपनिबंधक घोडके व सहाय्यक अधिकारी स्वप्निल मोरे यांनी केली. दोन्ही अर्ज वैद्य ठरल्याने माघारीच्या मुदतीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक घोडके यांनी चेअरमन पदी गौतम शाह तर व्हा. चेअरमन पदी भास्कर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करताच सभेस उपस्थित संचालकांनी बाके वाजून या निवडीचे स्वागत केले.

सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार; महापुरामुळे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली

यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा उपनिबंधक घोडके व व मावळते चेअरमन राजेंद्र भोसले बँक अधिकारी सेवकांतर्फे जनरल मॅनेजर कैलास बच्छाव यांनी सत्कार केला.

यावेळी मावळते चेअरमन राजेंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना संचालक मंडळासह अधिकारी, सेवकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

संचालक मंडळाचा पारदर्शी व एकमताने होत असलेला कारभार मामकोचे बलस्थान ठरला आहे. मतभेद होतात परंतु मनभेद होत नसल्याने बँकेची प्रगती पथावर वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट करीत भोसले पुढे म्हणाले मामको हितास सर्वोच्च प्राधान्य देत आपण कारभार केल्यामुळे आर्थिक वर्षात पाच कोटी 61 लाखाचा नफा बँकेस झाला.

तसेच ठेवीमध्ये 18 कोटींची वाढ होऊन ती 291 कोटी पर्यंत पोचली आहे. व्यापारी उद्योजकांसह सर्वसामान्यांना सुलभतेने कर्जवाटप प्रक्रिया राबवली त्यामुळे 145 कोटीचे कर्ज वाटप बँकेने केले आहे.

याबरोबर एटीएम, इ-कॉम,पॉस, आरटीजीएस, इ- स्टेटमेंट, एम एम एस, मिस कॉल अलर्ट आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देताना सटाणा रोड नवीन शाखेचे आधुनिकरण, वर्धमान नगर शाखेचे नूतनीकरण, चाळीसगाव फाट्यावर नवीन शाखेसाठी रिझर्व बँकेची मंजुरी मिळून आणली. स्वतःचा डेटा सेंटर उभा करण्यात मा मको बँक जिल्ह्यात अग्रेसर ठरविण्यात यश आल्याचे भोसले यांनी पुढे बोलताना सांगितले.

Adipurush : ‘आदिपुरुष’ला भंगार म्हंटल्यामुळे चित्रपटगृहाजवळ मारामारी, VIDEO झाला व्हायरल

बँकेचा डाटा, पैशाची सुरक्षितता, सायबर यंत्रणा यावर नूतन पदाधिकाऱ्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. नफ्याची क्षमता वाढवण्यासह शहराच्या आर्थिक विकासाची गती पुढे जात राहावी या दृष्टिकोनातून संचालक मंडळ प्रयत्नशील राहील. तसेच रिझर्व बँकेच्या नियमाची पूर्तता करत सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभे करण्याची गत अनेक दशकापासूनची परंपरा संचालक मंडळ यापुढेही जतन करेल अशी ग्वाही भोसले यांनी शेवठी बोलताना दिली.

नवनिर्वाचित चेअरमन गौतम शाह, व्हा. चेअरमन भास्कर पाटील यांनी बिनविरोध निवड केल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानत एकमताने कारभार करण्याच्या परंपरेची जतन करण्याची ग्वाही यावेळी बोलताना दिली.

या सभेस ज्येष्ठ संचालक रवींद्र दशपुते, शरद दुसाने, सतीश कलंत्री, भरत पोपळे, भिका कोतकर, नरेंद्र सोनवणे, नंदू तात्या सोयगावकर, ॲड. संजय दुसाने, सतीश कासलीवाल, उमेश अस्मर, शरद पाटील, विठ्ठल बागुल, रवींद्र ओस्तवाल, अजयकांत मंडावेवाला, डॉ.अलका भावसार, दादाजी वाघ, उपेंद्र मेहता, सुभाष सूर्यवंशी, उदय राहुडे आदि संचालकांसह जनरल मॅनेजर कैलास जगताप, विलास होनराव, भिला महाजन, संजय अहिरे आदी आधिकारी- सेवक उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

भारतातून बँकॉकला जाता येणार बायरोड; कधीपासून सुरु होणार महामार्ग?

- Advertisment -

ताज्या बातम्या